साईकिरण टाइम्स ब्युरो, 4 जुलै 2020
श्रीरामपूर | कोवीड १९ अर्थात कोरोना महामारीच्या प्रार्दुभावामुळे तब्बल ४२वर्षांची परंपरा असलेला येथील रेणुका आश्रमाचा गुरु पौर्णिमा महोत्सव अत्यंत साध्या पध्दतीने व 'व्हर्च्युअल'होणार असल्याची माहिती संयोजक व कार्यकारी विश्वस्त आदिनाथ जोशी यांनी दिली आहे.
दरवर्षी येथे अत्यंत ऊत्साहात व भव्य स्वरूपात महोत्सव संपन्न होतो भजन, किर्तन, सत्संग, घ्वजदिडी,महाप्रसाद असे भव्य आयोजन असते महाराष्ट्र व बाहेरील राज्यातून भाविक कार्यक्रमास येत, मात्र यंदा 'कोराना'मुळे साध्या पध्दतीने व आश्रमाच्या फेसबुक व यूठ्यूब चँनलवर लाईव्ह होणार आहे.
सकाळी राजराजेश्वरी रेणुका देवी महापूजा,घ्वजारोहन होईल त्यानंतर सदगुरू ओंकार नाथ महाराज पादूका व व्यासपीठ पूजन होईल सकाळी दहा वाजता आश्रमाचे व महोत्सवाचे संस्थापक देवीभक्तपरायण,मौनयोगी सदगुरू रेवणनाथ महाराज यांचे आँनलाईन प्रवचन,आशीर्वचन होणार आहे. भाविकांनी आपल्या घरात राहूनच सदगुरू चिंतन,नामस्मरण व गुरूमंत्र अनुग्रह जपाचे अनुष्ठान करावे व सामाजिक अंतर आणि आधुनिक तंत्रज्ञान सहाय्याने आयोजित ऊत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री सदगुरू सेवा मंडळाने केले आहे. आरतीने ऊत्सव सांगता होईल,सालाबादप्रमाणे अन्नदान महाप्रसाद भंडारा मात्र या वर्षी होणार नसल्याचे संयोजकांनी सांगितले आहे.