साईकिरण टाइम्स ब्युरो, 23 जुलै 2020
घोडेगाव (दादा दरंदले) नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील एक २४ वर्षीय व्यक्तीला त्रास होऊ लागल्याने त्या व्यक्तीने अहमदनगर येथील खाजगी प्रयोगशाळेत घशातील स्त्राव नमुना चाचणीसाठी दिला होता त्यामध्ये हा व्यक्ती गुरुवार २३ जुलै रोजी खाजगी प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालामध्ये कोरोना बाधित असल्याचा अहवाल आला असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.
युवक काही दिवसांपासून आजारी होता ,त्यास गावातील एका खाजगी डॉक्टर कडे उपचार सुरू होते परंतु फरक पडत नसल्याने त्यास नगर येथे हलवले होते , खाजगी लॅब मध्ये स्त्राव नमुना दिला होता त्याचा आज अहवाल प्राप्त झाला असता हा युवक पॉझिटिव्ह आढळला ,घोडेगाव मध्ये पहिला कोरोना रुग्ण आढळून आल्यावर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली ,त्या युवकाच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती घेण्याचे काम सुरू होते ,त्याच्या कुटुंबियांचे स्त्राव तपासणीसाठी घेतले असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली .
दरम्यान गावा मध्ये पहिलाच कोरोना रुग्ण आढळल्याने ग्रामपंचायत व कोरोना कमिटी सतर्क झाली असून सतर्कतेचा उपाय म्हणून गाव शुक्रवार व शनिवार दोन दिवस बंद राहणार असल्याची सूचना ग्रामपंचायतच्या माध्यमातून देण्यात आली .
सायंकाळी नेवासा तहसीलदार रुपेश कुमार सुराणा तसेच तालुका आरोग्य अधिकारी अभिराज सुर्यवंशी सोनई पोलीस स्टेशन चे स पो नि जनार्दन सोनवणे यांनी मारुती नगर मधील त्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली .रुग्णाच्या संपर्कातील 5 जणांचे स्त्राव तपासणीसाठी पाठवले असल्याची माहिती आरोग्य अधिकारी रजनीकांत पुंड यांनी दिली .
ग्रामपंचायत व प्रशासनाच्या वतीने आम्ही पूर्ण उपाययोजना केल्या असून ,संपूर्ण स्थितीवर पूर्ण लक्ष आहे ,ग्रामस्थांनी घाबरून जाऊ नये व कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवू नये
--- राजेंद्र देसरडा,सरपंच. घोडेगाव ता- नेवासा.