साईकिरण टाइम्स ब्युरो, 23 जुलै 2020
श्रीरामपूर | श्रीराम मंदिर निर्माणाने कोरोना जाईल का? या शरद पवार यांच्या वक्तव्याचा श्रीरामपूरातील भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध केला. श्रीरामपूरातून 'जय श्रीराम' घोषणा लिहिलेले 10 हजार पत्र पवार यांना पाठविण्यात येणार आहेत.
श्रीराम जन्मभूमीच्या मंदिर निर्माणाचा शुभ मुहूर्त ठरला. ट्रस्टने भूमीपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय जगातील सर्व रामभक्तांच्या भावनांना अनुरूप असल्याने देशातच नव्हे तर जगाच्या पाठीवर जिथे जिथे रामभक्त आहेत त्यांनी निर्णयाचे स्वागत केले, असे भाजपा पदाधिकाऱ्यांनी म्हंटले आहे. दरम्यान, श्रीराम मंदिर निर्माणाने कोरोना जाईल का, असा प्रश्न शरद पवार विचारला. पवार यांच्या या वक्तव्याचा श्रीरामपूर भाजपकडून समाचार घेण्यात आला. मंदिर निर्माण केल्याने कोरोना भलेही जाणार नसेल पण प्रभू श्रीरामचंद्रांचे मंदिर हा समस्त हिंदू धर्माच्या आस्थेचा विषय आहे. त्यामुळे पवार यांच्या विधानाचा निषेध म्हणून भारतीय जनता पार्टी तर्फे सर्व मंडळ स्तरावरून व बूथ स्तरावरून "जय श्रीराम" लिहलेले किमान १० हजार पत्र श्रीरामपूर शहर व तालुक्यातून पाठवल जाणार आहे, आशी माहिती शहर भाजपा संघटन सरचिटणीस सौदागर यांनी दिली.
गुरुवारी (दि. 23) रोजी 'जय श्रीराम' लिहिलेले पत्र खासदार शरद पवार यांना पाठविण्यात आले. यावेळी भाजपा शहर संघटन सरचिटणीस सतीश सौदागर, भाजपा संपर्क अभियान शहर संयोजक विशाल अंभोरे , युवा मोर्चा मा.शहराध्यक्ष संजय यादव, भाजप शहर सरचिटणीस विजय लांडे ,बजरंग दल मा. जिल्हा संयोजक सचिन बाकलीवाल,भाजपा शहर उपाध्यक्ष गणेश परदेशी, बाळासाहेब आहिरे, युवा मोर्चाचे उपाध्यक्ष प्रफुल्ल रावत, विवेक देशमुख ,सोनू गौतम, अमोल मावस, आदेश मोरे ,अण्णा भालेराव ,अक्षय नागरे ,सुहास पंडित, दिनेश दळवी, बाळासाहेब डफळ आदी उपस्थित होते.