शेवटची काही सेशन्स श्री शत्रुघ्न सिन्हा, श्री सुभाष घई, श्रीमती सुप्रिया पाठक, श्रीमती शबाना आझमी आणि श्री. रश्मीन मजीठिया यांच्यासह कोकोनट थिएटरच्या फेसबुक पेजवर - शो मस्ट गो ऑन!
थिएटर मास्टर्स थेट पाहण्याची सुवर्णसंधी!!!
साईकिरण टाइम्स ब्युरो, 31 जुलै 2020
मुंबई | कोकोनट थिएटर २६ एप्रिल २०२० पासून दररोज संध्याकाळी ६:०० वाजता ‘चाय-वाई अँड रंगमंच’ इन अससोसिएशन वित्त तिकीटनिंजा.इन अभिमानाने सादर करतात. ज्येष्ठ अभिनेते, लेखक, दिग्दर्शक, थिएटर डिझाइनर आणि तंत्रज्ञ कोकोनट थिएटरच्या फेसबुक पेजवर लाइव्ह येतात आणि त्यांचे नाट्य अनुभव, कथा आणि प्रेरणादायक टिप्पण्या सर्व नाट्यप्रेमींना सामायिक करतात.
कोकोनट थिएटरने ‘चाय-वाई अँड रंगमंच -२०२०’च्या पहिल्या हंगामात भारताच्या विविध भागातील आणि इतर देशांतील थिएटर तज्ज्ञांसमवेत बॅक टू बॅक १०८ ऑनलाइन सेशन्सची लाइन अप करत एक इतिहास गाठला आहे. नाट्यक्षेत्रातील भूमिकेनुसार वक्तांनी विशिष्ट विषयावर ऑनलाइन सेशन्स सादर केले आहेत. त्यांनी त्यांचे संस्मरणीय नाट्य अनुभव व्यक्त करून थिएटर विद्यार्थी, हौशी थिएटर कलाकार, लेखक, दिग्दर्शक, संगीतकार, नृत्य-दिग्दर्शक, मेक-अप कलाकार, डिझाइनर, तंत्रज्ञ, थिएटर ग्रुप्स आणि थिएटरशी जोडलेल्या अनेकांना प्रेरणा देण्याचे कार्य आहेत.
कोकोनट थिएटरचे निर्माते आणि कोकोनट मीडिया बॉक्स एलएलपीचे व्यवस्थापकीय संचालक. श्री. रश्मीन मजीठिया यांच्यामते, कोविड-१९ आणि जागतिक लॉकडाऊनमुळे २०२० हे वर्ष संपूर्ण जगासाठी अतिशय हानिकारक ठरले आहे. विशेषत: नाट्य क्षेत्र जे पूर्णपणे लाईव्ह ऍक्ट वर अवलंबून आहे. डिजिटल व्यासपीठावरील हा पहिला ऑनलाईन पुढाकार आहे, ज्याचे उद्दीष्ट संपूर्ण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय थिएटर फ्रेटर्निटीला या सेशन्सद्वारे जोडणे आणि थिएटर प्रॅक्टिशनर्सना सक्रिय करत त्यांचे मनोरंजन करणे आहे.
हा एक महत्वाकांक्षी आणि आव्हानात्मक प्रकल्प होता कारण भारत तसेच जगाच्या वेगवेगळ्या भागांमधून, रंगमंच संस्कृतींमधून तसेच वेगवेगळ्या टाईम झोनमधून थिएटर दिग्गज मिळवणे आणि बॅक टू बॅक सेशन्स आयोजित करणे हे अत्यंत कठीण काम आहे. ‘चाय-वाई अँड रंगमंच’ वर उपस्थित असलेले पाहुणे इंग्रजी, हिंदी, गुजराती, बंगाली, मराठी, पंजाबी, कन्नडा, मल्याळम, ओडिया, आसामी, डोगरी आणि इतर बऱ्याच वेगवेगळ्या भाषांमध्ये नाटक करत आहेत. काही वक्तांनी लहान मुलांचे थिएटर, पपेट्री थिएटर, क्लासिकल थिएटर आणि लोक रंगमंच याबद्दल विशेष सत्र केले. हि माहितीपूर्ण सत्रे दररोज हजारो लोक पहात आहेत. जे त्यांचे मनोरंजन करतात. लवकरच सर्व सत्राचे संपूर्ण संग्रहण कोकोनट थिएटर युट्यूब चॅनेलवर अपलोड केले जाईल, जे जगातील कोणत्याही भागातील प्रत्येकासाठी विनाशुल्क उपलब्ध असेल.
काही सन्मानित नावे, पद्मश्री आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कृत श्रीमती रीटा गांगुली, श्री एम.एस.सथ्यू, श्री बन्सी कौल, श्री बलवंत ठाकूर, श्री मनोज जोशी, श्रीमती नीलम मानसिंह, श्री वामन केंद्रे, श्री सतीश अलेकर, श्री दादी पुडुमजी आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कृत श्रीमती सुषमा सेठ, श्री कुलदीप सिंग, श्रीमती डॉली अहलुवालिया, प्राध्यापक अशोक भगत, श्री प्रसन्ना, श्री सुरेश शर्मा (संचालक - नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा), श्री आमोद भट्ट, श्रीमती. अंजना पुरी, श्रीमती नीना तिवाना, श्री संजय उपाध्याय, श्रीमती रोहिणी हट्टंगडी, श्रीमती नादिरा बब्बर, श्रीमती हिमानी शिवपुरी यांनी आतापर्यंत सेशन्स केले आहे.
स्टॉलवर्टमधील सहभागींमध्ये आदिल हुसेन, रजत कपूर, शर्मन जोशी, राजपाल यादव, मकरंद देशपांडे, अतुल सत्य कौशिक, महेश दत्तानी, के.के. रैना, लिलेट दुबे, राकेश बेदी, सोनाली कुलकर्णी, सलीम आरिफ, रघुबीर यादव, लुबना सलीम, अनंत महादेवन, इला अरुण, अंजन श्रीवास्तव, रणजित कपूर, टीकू तल्सानिया, सचिन खेडेकर, संदीप सोपारकर, नीना कुलकर्णी, जयती भाटिया, रमेश तलवार, चंद्रकांत कुलकर्णी, केवल धालीवाल, पल्लवी एमडी, सुमीत राघवन आणि इतर अनेक ज्येष्ठ नाट्य तज्ञांनी आतापर्यंत सेशन्स केले आहे.
ग्लोबल थिएटर एक्सपर्ट्स, यूएसएमधील - थ्री टाईम्स टोनी अवॉर्ड पुरस्कृत श्री. स्कॉट पास्क, जगप्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक श्री. जेफ बेरॉन, कलात्मक दिग्दर्शक श्री. जॉनथन हॉलँडर, आंतरराष्ट्रीय प्रोडक्शन डिझाइनर श्री.नील पटेल (मुगल-ए-आजम म्युझिकलचे प्रॉडक्शन डिझायनर), लेखक-अभिनेता-दिग्दर्शक श्रीमती जेसिका लिटवॉक, लेखक-दिग्दर्शक ऍना कॅंडिडा कॅनेरो, यूकेमधील - कलात्मक दिग्दर्शक श्री. ब्रुस गुथरी आणि अभिनेता-दिग्दर्शक मार्क वेकलिंग, इजिप्त थिएटरचे संचालक श्री. आम्र काबिल, नॉर्वेचे नृत्यदिग्दर्शक कुमारी इंग्री फिक्सडल, ऑस्ट्रेलियामधील लेखक-दिग्दर्शक श्री. डेव्हिड वुड्स आणि अभिनेता-दिग्दर्शक श्री. ग्लेन हेडन, दक्षिण आफ्रिकामधील नाटककार श्रीमती मेगन फर्निस आणि अभिनेती-दिग्दर्शक श्रीमती मोत्साबी टिलेले यांनी आपली आतापर्यंत सेशन्स केले आहे.
पुढील आगामी सेशन्स खालील प्रमाणे..
1. आदरणीय शत्रुघ्न सिन्हा सर - 30 जुलै 2020
2. आदरणीय सुभाष घई सर - 31 जुलै 2020
3. श्रीमती. सुप्रिया पाठक - 1 ऑगस्ट 2020
4. आदरणीय शबाना आझमी मॅम - 2 ऑगस्ट 2020
5. श्री रश्मीन मजीठिया - 3 ऑगस्ट 2020
वरील सर्व नामांकित व्यक्ती आपल्या नियमित कामात व्यस्त आहेत परंतु त्यांनी विशेषत: सेशनसाठी सहमती दर्शविली आहे जेणेकरुन माहिती व मनोरंजन दोन्ही प्रेक्षक आणि त्यांच्या अनुयायांपर्यंत पोहोचू शकतील. श्री. शत्रुघ्न सिन्हा हे सुप्रसिद्ध कलाकार आणि भारतीय सिनेमाचे एक ज्येष्ठ अभिनेते आहे. त्यांनी त्यांच्या नाटकांच्या तीव्र उत्कटतेमुळे या मंचामध्ये सहभाग करायची आवड दाखवली. शोमॅन श्री. सुभाष घई एक प्रख्यात फिल्म मेकर, दिग्दर्शक, निर्माते, स्क्रीन लेखक व शिक्षणतज्ज्ञ आहेत त्यांनी नेहमीच कला प्रकारांना प्रोत्साहन देतात.
श्रीमती. सुप्रिया पाठक ह्या चित्रपट, टेलिव्हिजन आणि रंगमंचाची भारतीय अभिनेत्री आहे, त्यांनी नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहेत. शबाना आझमी ह्या चित्रपट, दूरदर्शन आणि थिएटरच्या भारतीय अभिनेत्री आहेत. त्यांना पद्मभूषण, ५ नॅशनल अवॉर्ड विनर आणि इतर अनेक पुरस्कार भारत व इतर विविध देशांकडून देण्यात आले आहेत. श्री.रश्मीन मजीठिया एक प्रख्यात उद्योगपती आणि कोकोनट थिएटरचे निर्माते, ‘चाय-वाई अँड रंगमंच - २०२०' च्या पहिल्या सीजनचे शेवटचे म्हणजेच १०८ वे सेशन करणार आहेत. ते थिएटर निर्माता म्हणून सध्याची परिस्थिती लक्षात घेता, नाट्यगृहातील कामगिरीची आवड दर्शविणारे ऑनलाइन थिएटरचा हा उपक्रम सुरू करण्याबद्दलचे त्यांचे विचार आणि त्यांची मते व्यक्त करतील. या उपक्रमाची सुसंधी साधून, आपला अनमोल वेळ देणाऱ्या सर्व राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अतिथी वक्त्यांचे आभार प्रदर्शनाचा पुढाकारही ते घेतील. आपण दररोज लाइव्ह सेशन्स किंवा मागील सेशन्स पाहू इच्छित असल्यास खालील लिंकवर क्लिक करा https://www.facebook.com/watch/CoconTheatre/555712818663573/
कृपया कोकोनट थिएटर फेसबुक पेजला लाईक आणि फॉल्लो करा.