ज्ञानमाऊली शाळेचा 100% निकालाची परंपरा कायम ; सारिका ढगे प्रथम तर सेजल चौधरी द्वितीय

साईकिरण टाइम्स ब्युरो, 1 ऑगस्ट 2020
घोडेगाव (दादा दरंदले)  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या परीक्षेचा ऑनलाइन निकाल २९ जुलै राजी दुपारी १ वाजता पुणे बोर्ड ने प्रसिद्ध केला. यात घोडेगाव (ता.नेवासा)येथील ज्ञानमाऊली शाळेचा या ही वर्षी 100% निकाल लागला शाळेतील ४६ विद्यार्थी मोठे गुण मिळवून उत्तीर्ण झाले.

         ज्ञानमाऊली शाळेतील कु सारिका कल्याण ढगे हिने (९२.४०%) प्रथम क्रमांक मिळवला , तर कु सेजल सुनील चौधरी (९१.८०%) द्वितीय , तर पूर्वा सोनवणे (९१.४०%) व सारिका शेटे (९१.४०%) तृतील क्रमांक मिळवला. यासर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे नेवासा गट शिक्षणाधीकारी श्री.कराड साहेब , पंचायत समिती सदस्य बाळासाहेब सोनवणे , शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुहास गोंटे , डॉ सुनील चौधरी , फादर  सुरेश साठे , माजी सभापती दिलीपराव लोखंडे , सरपंच राजेंद्र देसरडा यांनी अभिनंदन केले. या विद्यार्थ्यांना शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post