साईकिरण टाइम्स ब्युरो, 11 जुलै 2020
शिरसगाव ( वार्ताहर )भूमी फौंडेशनचे सामाजिक कार्य कौतुकास्पद असून त्यांनी सामाजिक,शैक्षणिक आदी कार्यात मोलाचे योगदान असल्याचे प्रतिपादन आत्मामालिक ध्यानपीठाचे विश्वात्मक जंगली महाराजदास यांनी प्रतिपादन केले.
परमेश्वर हा आत्म्यातच असतो. देवळात देव शोधण्यापेक्षा माणसात देव शोधणे हे आज अतिशय महत्वाचे आहे,असेही महाराज म्हणाले. भूमी फौंडेशनच्या वतीने इनेजिक केगन वाटर[INAGIC KANGEN WATER]या जपान कंपनीचे ७ लाख रु.किमतीचे अल्कालीन वाटर आयनायझर मशीन आत्मामालिक ध्यानपीठ विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट कोकमठाण यांना प्रांताधिकारी श्रीरामपूर अनिल पवार यांच्या हस्ते व आत्मामलिक संस्था अध्यक्ष व माजी प्रांताधिकारी नंदकुमार सूर्यवंशी,संस्थापक भूमी फौंडेशन प्रा कैलास पवार,जागतिक संविधान व संसदीय संघ सदस्य बी आर चेडे,भीमराज बागुल,तुकाराम तांगडे,ओमकार देशपांडे,चांगदेव महाराज यांच्या उपस्थितीत भेट प्रदान करण्यात आली.
यावेळी मान्यवरांचा आत्मा (soul) ची प्रतिमा,शाल,प्रसाद देऊन महाराजांनी सत्कार करण्यात आला.यावेळी प्रांताधिकारी अनिल पवार यांनीही भूमी फौंडेशन कार्याचे कौतुक केले.१९७२ पासून ही मशीन कार्यरत असून अमेरिकन एन्टी कॅन्सर इन्स्टिट्यूट येथे रुग्णासाठी वापर केला जातो.इनाजिक केंगन वाटर विविध प्रकारच्या आजारावर उपचारात्मक ठरते. अशा स्वरूपाचे हे आयनाझर प्लाटिनीयम,व टायटीयनम किटचे बनविण्यात आले आहे..१]शेतीची केमिकल्स अन्नातून पाण्याव्दारे दूर करते.२]प्रकृतिस्वास्थ्य,पिण्याचे पाणी,३]स्वच्छ पाणी बालकाकरिता ४]ब्युटी वाटर:-चेहरा,केस,त्वचेसाठी ५]शक्तिशाली असिडीक वाटर –व्हायरस व बेक्टेरिया यांना मारक असे ५ प्रकारचे पाणी देणारे हे मशीन विविध आजारापासून मुक्तता करते.आभार प्रदर्शन ट्रस्ट अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी यांनी केले.