साईकिरण टाइम्स ब्युरो, 25 जुलै 2020
बेलापुर (प्रतिनिधी )बेलापुर खुर्द येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील गरजु विद्यार्थ्यांना प्रत्येकी वह्या व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
माजी सरपंच व सेवानिवृत्त प्राध्यापक अशोक बडधे व भारतीय सेना दलातील हवालदार किशोर थोरात यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोनशे पेजेसच्या चार वह्या तसेच शालोपयोगी लेखन साहित्याचे वितरण पालकांना टप्प्याटप्प्याने बोलावून करण्यात आले. यावेळी तोंडाला मास्क, सॅनिटायझर, सामाजिक अंतर आदी नियमांचे पालन करण्यात आले. तसेच कोरोनासंबंधी घ्यावयाची काळजी बाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी सर्वश्री सुनील बारहाते, राजीव रणदिवे, वेणूनाथ माने, राजेंद्र कुंकुलोळ, मूलख्याध्यापिका मुख्याध्यापिका सौ. दायमा आदी प्रमुख उपस्थित होते.