साईकिरण टाइम्स ब्युरो, 25 जुलै 2020
श्रीरामपूर | कोल्हार मध्ये शनिवारी (दि.25) सकाळी बारा वाजेच्या दरम्यान घास उत्पादक शेतकर्यांनी खाजगी घास खरेदी करणाऱ्या शेतकरी केंद्रात तासभर ठिय्या आंदोलन केले.
सन २०११ पासून नियमितपणे कोल्हार,फत्याबाद,उक्कलगाव कडीत बु कडीत खुर्द मांडवे बु कोल्हार खुर्द येथिल व राहुरी परिसरातील शेतकर्यांनी शेतकरी केंद्रामार्फत लसूण घास खाजगी 'मालकी'च्या असणार्या कंपनीला घास पुरविला जात आहे. सन २०११ साली 'ठरल्या'प्रमाणेच शेतकर्यांकडुन त्या पध्दतीचे अॅग्रीमेट्स करून घेतले.
त्याप्रमाणेच अॅग्रीमेट्सनुसार 'कंपनीने' शेतकऱ्याला लसुन 'घास'ला प्रतिकिलो २.९० पैसे दराने भाव दिला होता. हा हमीभाव ठरविला असतानाच शेतकऱ्याला विश्वासात न घेताच कंपनीने घासला प्रतिकिलो २ रू दराने भाव निश्चितच करून अशाप्रकारे अचानकच काही पूर्वसुचना न करता प्रतिकिलो 'मागे' शेतकर्यांना ९० पैसे तोटा हकनाक सहन करावा लागत आहे.
त्यातच घास कापनीही वेळेत होत नसल्यामुळे आणखीन हीच अडचण शेतकर्यांसमोर उभी राहिली आहे.
संबधीतच शेतकर्यांनी शनिवारी सकाळी घास खरेदी केंद्रात जमा होत कोल्हारचे शेतकरी घास खरेदी केंद्राचे अजीत सनस यांना जाब विचारला असता, करारापद्धतीने का भाव दिला जात नाहीत?असा उपस्थित सवाल घसा उत्पादक शेतकर्यांनी केला.
घास उत्पादकांना कोणतेही पूर्वसूचना न देता असा निर्णय संबधीतच कंपनीने घेतला कसा? खरा सवाल उपस्थित होतो आहे. यावेळी पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शेतकरी आक्रमक झाले त्यातच काहीच शेतकरी सुद्धा दुहेरीच्या भुमिकेत होते यांची चलबिचल सुरू होती काहीचे म्हणणे होते की,निर्णयावर ठाम राहिल्यास तोडगा निघेल असे काही शेतकर्यांचे मत होते.
तासभरच्या ठिय्या आंदोलनानंतर दोन दिवसातच वरिष्ठांना माहिती कळवा,नाही तर घास उत्पादक शेतकरी मंगळवारपासून कंपनीला घास पुरवठा करणार नाही असा सत्कात्मक निर्णय न घेतल्यास कोल्हारमध्ये आंदोलन केले जाईल इशारा घास उत्पादक शेतकर्यांनी दिला असून, कोल्हारचे व राहुरीचे आणि श्रीरामपूर परिसरातील लसुण घास उत्पादक शेतकर्यांनी भाग्यलक्ष्मी डेअरी फार्मचे देंवेद्रभाई शहा यांना निवेदनाद्वारे मागणी केली. या मागणीच्या वतीने डेअरी फार्म केद्रांचे अजित सनस यांनी निवेदन स्वीकारले.
मागणी निवेदनात चंद्रशेखर खर्डे, अॅड पुरुषोत्तम थोरात, प्रकाश थोरात, सत्यवान आचपळे, संजय विठ्ठल शिंदे, आदिनाथ ज-हाड, कचरू भागवत, केशव चिंधे, पुरूषोत्तम थोरात, अशोक चिंधे, कडीतचे संरपच ज्ञानेश्वर वडितके, अशोक जरे, गुणवंत आठरे, इमानदार समीर, राजेद्र दातीर, राऊत केतन, गोकूळ तांबे, शरद डुकरे, रावसाहेब तांबे, संदिप नान्नोर, आदीसह लसूण घास उत्पादक शेतकर्यांच्या सह्या निवेदनात आहेत.