साईकिरण टाइम्स ब्युरो, 18 जुलै 2020
बेलापूर (प्रतिनिधी ) बाजारपेठेत वावरताना नागरीकाकडून नियमांची पायमल्ली केली जात असुन सोशल डिस्टनचा नियम पायदळी तुडविला जात आहे. लोक मास्क शिवाय वावरताना दिसत आहे. त्यामुळे बेलापूरकरांच्या मनातील कोरोनाची भिती कमी झाली की काय, अशी शंका उपस्थित केली जात आहे.
बेलापूरात एक व्यक्ती कोरोना संशयीत आढळल्यामुळे गावकर्यांनी गाव बंद ठेवुन काही धाडसी निर्णय घेतले परंतु बंदिस्त खोलीत घेतलेले हे निर्णय कागदावरच राहीले आहे अनेक जण गावात विनाकारण वावरताना दिसत आहे गावात कोरोना समीतीच्या बैठकीत मास्क न वापरणार्या व्यक्तींना शंभर रुपये दंड तसेच ठरलेल्या वेळेनतंरही दुकाने विक्री करणार्या व्यापार्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला होता परंतु हे सर्व निर्णय बंद खोलीत झालेल्या बैठकी पुरतेच मर्यादित राहीले आहे कोरोना कमीटीही सुस्त झाली असुन पोलीस प्रशासनही ही बाब गांभिर्याने घेताना दिसत नाही बेलापूर ग्रामपंचायतीने नियम न पाळणाऱ्या काही व्यापारी व नागरीकावर दंडात्मक कारवाई केली, पावती फाडली. परंतु, दंडच वसुल केला नाही. त्यामुळे, नागरीकांना त्यातील गांभीर्य कमी झाले की काय रस्त्यावर लोक विनाकारण नियम न पाळता फिरताना दिसतात. काही लोक टोळक्या टोळक्याने चौका चौकात गप्पा मारताना दिसत आहेत. कोरोना समीतीने पुन्हा एकदा सक्रीय होवुन नियम काटेकोर पालन करण्याची गरज आहे नाही तर पुन्हा एखादा बाधीत झाल्यावर सर्व जण सावध व्हायचे बेलापूर पोलीसांनी देखील गस्त वाढवुन नियम न पाळणार्यांना धडा शिकवावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.