साईकिरण टाइम्स ब्युरो, 24 जून 2020
श्रीरामपूर | वर्ल्ड कॉन्स्टिट्यूशन अँड पार्लमेंट असोशिएशन ( डब्ल्यूसीपीए ) अर्थात जागतिक संविधान व संघाच्या श्रीरामपूर चॅप्टर ( महाराष्ट्र ) प्रसिध्दी विभाग प्रमुखपदी जेष्ठ पत्रकार व डब्ल्यूसीपीएचे वरिष्ठ सदस्य श्री.बी.आर. चेडे यांची नियुक्ती झाली आहे. त्या आशयाचे पत्र डब्ल्यूसीपीएच्या श्रीरामपूर ( महाराष्ट्र ) चॅप्टरचे अध्यक्ष विघावे यांनी श्री चेडे यांना सुपूर्द केले.
बाबासाहेब चेडे हे श्रीरामपूर तालुक्यातील वरिष्ठ पत्रकार असून गेली ४० वर्ष ते या व्यवसायात असून फोटोग्राफी व सामाजिक क्षेत्रातही त्यांनी उत्तम कार्य केले आहे.
बी.आर.चेडे यांना नियुक्ती पत्र प्रदान समारंभ प्रसंगी डब्ल्यूसीपीएचे श्रीरामपूर ( महाराष्ट्र ) चॅप्टरचे अध्यक्ष दत्ता विघावे, सचिव भाऊराव माळी, जेष्ठ सदस्य भिमराज बागुल तसेच सुर्यभान सातदिवे व श्रीकांत बोरूडे हे सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
Tags
ताज्या घडामोडी