Nevasa : नेवासा तालुका वंजारी सेवा संघाच्या वतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवलेल्या उमेदवारांचा सत्कार

साईकिरण टाइम्स ब्युरो, 24 जून 2020
नेवासा फाटा (दादा दरंदले) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेत उपजिल्हाधिकारी,राज्य उत्पादन शुल्क उपअधीक्षक, पोलिस उपअधीक्षक, तहसीलदार, नायब तहसीलदार, उद्योग अधिकारी पदे मिळवून नेवासा तालुक्यातील उमेदवार चमकले आहेत. यांचा नेवासा तालुका वंजारी सेवा संघटनेच्या वतीने यथोचित सन्मान नेवासा फाटा करण्यात आला आहे.

            जुलै 2019 मध्ये राज्य सेवा मुख्य परीक्षा झाली. 420 जागांसाठी फेब्रुवारी 2020 मध्ये  मुलाखती झाल्या. परीक्षेचा अंतिम निकाल शुक्रवारी जाहीर झाला. यात दादासाहेब दराडे यांची उपजिल्हाधिकारी पदी, डॉ वंदना कारखेले यांची उपअधीक्षक पदी, सौ स्नेहा साळुंके तहसीलदार पदी तर योगेश एरंडे यांची मंत्रालय कक्ष अधीकारी पदी निवड झाली. यांच्या झालेल्या निवडीबद्दल नेवासा फाटा येथे वंजारी समाज सेवा संघ नेवासा व मा भिवाजीराव आघाव मित्र मंडळ यांच्या वतीने त्यांचा यथोचित सन्मान हा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिनकरराव गर्जे हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भिवाजी आघाव यांनी केले. यावेळी यमनाजी आघाव,अनिल गर्जे,भाऊपाटील घुगे,दत्तात्रय सांगळे,रामकीसन गर्जे,जावळे सर,शिवाजीराव शिरसाठ,दत्तात्राय आघाव,महादेव आव्हाड,अशोकराव खाडे,बाबासाहेब देवखिळे,बाळू बांगर,अशोकराव कारखेले,पांडुरंग उभेदळ,बाळासाहेब आव्हाड,तुळशीराम घुले,अशोक चौधर,उद्धव आव्हाड,सुभाष दराडे,सौ.आशाताई कारखेले,प्रीतम साळुंके आदी उपस्थित होते. शिवाजीराव शिरसाठ यांनी उपस्थितांचे आभार मानले. 

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post