श्रीरामपूर - राहता - शिर्डी बायपास रस्ता दुरुस्तीसाठी मुंडण आंदोलन ; आप, आरपीआय, भिमशक्तीचा जाहीर पाठिंबा

साईकिरण टाइम्स ब्युरो, 23 जून 2020
श्रीरामपूर | श्रीरामपूर एमआयडीसीतील साई कॉर्नरपासून गणेशनगर - राहता - शिर्डी बायपास पर्यन्तच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असुन हे खड्डे बुजवण्यासाठी दत्तनगर येथील सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे यांनी अनेक आंदोलने केली आहेत. सोमवारी (दि. 22) या ठिकाणी अपघात होऊनही याची जबाबदारी कुणीही घ्यायला तयार नसल्याने अपघात झालेल्या ठिकाणी खड्डयात बसून मंगळवारी ( दि.23)  मुंडन आंदोलन करून निषेध नोंदवण्यात आला. या आंदोलनास आप, आरपीआय, भीमशक्ती संघटनेने जाहीर पाठिंबा दिला. 

             श्रीरामपूर एमआयडीसी रोडवर संध्याकाळी  खड्डे चुकवण्यासाठी एका मोटारसायकलने सायकलस्वाराला उडवून दिले. यात एक गंभीर जखमी तर दुसरा डोक्यावर पडलेल्या असल्याने त्याची प्रकृती नाजूक आहे.  तरी देखील या रस्त्याची जबाबदारी कोणीही घेत नसल्याने अपघात घडलेल्या ठिकाणी खड्डयात बसुन मुडंन अदोलन करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे यांनी या रस्त्यासाठी अनेकवेळा  वेगवेगळ्या प्रकारची अदोलने केली आहे. कधी खड्डयात झोपून तर कधी खड्डे मध्ये झाडे लावून. हा रस्ता वादग्रस्त असुन जिल्हा परिषद, एमआयडीसी प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम खाते एकमेकांनकडे बोट दाखवतात. 

              15 दिवसात अदोलनाची दखल घेऊन रस्त्यावरील खड्डे न बुजवल्यास संबंधित अधिकारी यांच्या तोडाला काळे फासण्यात येईल, असा इशारा आरपीआयचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राजाभाऊ कापसे यांनी दिला. तर भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप मगर यांनी रस्ता खराब आहे, स्ट्रीट लाईट पुर्णपणे बंद आहे. अधिकारी लक्ष देत नसल्याने त्याच्यावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात  आला पाहिजे, असे सांगितले. आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष तिलक डुगरवाल यांनी एमआयडीसी मधील रस्ते खड्डेमय झाले आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हेसुद्धा समजत नाही.  हा रस्ता पूर्णपणे मौत का कुवा झाला आहे असल्याचे म्हणाले. यावेळी प्रशासनाचा निषेध करून मुंडण आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी दत्तनगर ग्रामपंचायत सरपंच सुनील शिरसाठ, आरपीआयचे तालुका संघटक संजय बोरगे, ग्रामपंचायत सदस्य किरण खंडागळे ,प्रदिप गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिवलकर, संजय थोरात, संदीप गायकवाड, वालमीक निकम, संतोष निकम, अशोक शिंदे आदी उपस्थित होते.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post