साईकिरण टाइम्स ब्युरो, 15 जून 2020
श्रीरामपूर | श्रीरामपूर शहरातील रोड सोडाच परंतू अमरधाम कडे जाणाऱ्या रस्त्याला सुद्धा ग्रहण लागल्याचे उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी म्हटले आहे.
गेल्या तीन वर्षांपासून श्रीरामपूर शहरातील रस्ते आणि त्यावर असलेले खड्डे हे जणू काही समीकरणच बनले आहे.
शहरातील मुख्य रोड असलेला मेनरोड डांबरीकरण कारणेकरिता अनेक वेळेस पालिका सभेत तासन तास चर्चा झाली.
मात्र, अजून काहीच कार्यवाही नाही.शहरातील जनतेला फक्त आणि फक्त घोषणा करुन स्वप्न दाखयवाचे तेवढेच काम सत्ताधाऱ्यांनी केले आहे.कुठल्याही कामात राजकारण करणे एवढाच अजेंडा डोळ्यासमोर ठेवल्याने आज श्रीरामपूर शहराची दुरवस्था झाली आहे.
शहरातील जनतेला जिवंतपणी सोडाच मृत्यूनंतची वाट सुद्धा बिकट झाली आहे. अमरधाम समोर मोठ्या प्रमाणावर पाणी साचत असून रोडची अवस्था बिकट झाली आहे.
त्यामुळे पालिका प्रशासनाने निदान अमरधाम कडून कॅनॉल पुलाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम करावे अशी मागणी करण ससाणे यांनी केले आहे.
दोन वर्षांपासून शहरातील रोडबाबतचे प्रश्न सवर्च नगरसेवकांनी उपस्थित केले त्यावर लोकनियुक्त नगराध्यक्षा यांच्याकडून एकच उत्तर मिळाले की, पावसाळा संपल्यानंतर लगेच काम चालू होईल असे करता करता सत्ताधाऱ्यांचे तीन पावसाळे गेले मात्र श्रीरामपूर शहरातील रस्त्यांची अवस्था आहे तशीच असल्याचे ससाणे यांनी म्हटले आहे .