साईकिरण टाइम्स ब्युरो, 17 जून 2020
घोडेगाव | दादा दरंदले | आत्मामलिक शैक्षणिक संस्था कोकमठाण कोपरगाव यांच्या वतीने 2012 पासून दरवर्षी आत्मामलिक प्रज्ञशोध परीक्षेचे आयोजन केले जाते , तसेच याही वर्षी या परीक्षेमध्ये हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते , त्याचप्रमाणे या प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये सुजाता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व मोठ्या गुण प्राप्त करत उत्तीर्ण होऊन राज्यात प्रथम व द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण होऊन मोठे यश संपादन केले.
प्रथम आलेल्या विद्यार्थ्यामध्ये लांडे धनश्री व द्वितीय आलेली कोमल जगताप या दोन विद्यार्थ्यांचा समावेश आहे संस्थेच्या वतीने प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप व द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांनीला टॅब चे पारितोषिक देण्यात आले या दोन विद्यार्थ्यांचे पालकांच्या व शिक्षकांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले व त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरी बद्दल सर्वत्र कौतुक होत आहे परीक्षेचा महत्वाचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यां मध्ये स्पर्धा परीक्षेची गोडी लागावी व शिष्यवृत्ती परीक्षेची पूर्वतयारी तसेच इयत्ता 10 वी च्या राष्ट्रीय प्रज्ञशोध परीक्षेची पूर्वतयारी हा महत्वाचा हेतू आहे .
स्कूल च्या वतीने दरवर्षी अशा विविध स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात येते व त्यामधून विद्यार्थ्यांचे ज्ञान व कौशल्य यांची वृद्धी कशी होईल याची तयारी करून घेतली जाते. यशस्वी विद्यार्थ्यांना सुजाता इंटरनॅशनल स्कूल चे सर्व शिक्षक वृंद व मुख्याध्यापक किरण सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले.