साईकिरण टाइम्स ब्युरो, 15 जून 2020
श्रीरामपूर | माजीमंत्री आ.राधाकृष्ण विखे यांच्या वाढदिवसानिमित्त विखे पाटील मित्रमंडळ व जनसेवा आघाडीतर्फे श्रीरामपूर शहर व तालुक्यातील पोलिसांच्या सुरक्षिततेसाठी एन९५ मास्क व सॅनिटायझर पोलीस उपअधीक्षक राहुल मदने , पोलीस निरीक्षक श्रीधर बहिरट यांचेकडे पंचायत समितीचे माजी सभापती दीपक पटारे, नानासाहेब पवार, नानासाहेब शिंदे, उपसभापती नितीन भागडे, केतन खोरे, नगरसेवक जितेंद्र छाजेड, नगरसेविका वैशाली चव्हाण, बाळासाहेब गांगड, संदीप चव्हाण, बाजार समितीचे संचालक राधाकृष्ण आहेर, प्रकाश चित्ते, गिरीधर आसने, गणेश मुदगुले, बाबासाहेब चिडे, विजय पाटील आदींच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले.
यावेळी बोलताना दीपक पटारे म्हणाले की, दरवर्षी विविध उपक्रमांनी साजरा होणारा विखे साहेबांचा वाढदिवस यंदा कोरोनाच्या संकटामुळे साजरा न करता वंचित नागरिकांना मदतीचा निर्णय साहेबांनी घेतला.
गेल्या तीन महिन्यांपासून पोलीस प्रशासनाने स्वतःचा जीव धोक्यात घालून देशातील नागरिकांचा कोरोनापासून बचाव करण्यात महत्वाची भूमिका निभावत आहे.
चोवीस तास आपल्या नागरिकांसाठी झटणाऱ्या श्रीरामपूर शहर व तालुक्यातील पोलीस बांधवांच्या सुरक्षेसाठी माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने एन९५ मास्क व सॅनिटायझर देत असल्याचे पटारे यांनी सांगितले.
यावेळी भाजयुमोचे अक्षय वर्पे, महेंद्र पटारे, अमोल कासार, नानासाहेब आसने आदींसह मान्यवर उपस्थित होते.