Shrirampur : शहरातील गाळ्यांचे कर, घरपट्टी, पाणीपट्टी माफ करावी ; समाजवादी पार्टीची नगराध्यक्षा व मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी

                  
साईकिरण टाइम्स ब्युरो, 8 जून 2020
श्रीरामपूर | सन 2020 या आर्थिक वर्षातील नगरपालिका हद्दीतील गाळ्यांचे कर, घरपट्टी, पाणीपट्टी माफ करावी तसेच पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व रस्त्यांची डागडुजी करावी, अशा विविध मागण्या समाजवादी पार्टीच्या वतीने नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक, मुख्याधिकारी समीर शेख यांच्याकडे निवेदन देऊन करण्यात आल्या आहेत. 
    
                 समाजवादी पार्टीच्या वतीने पालिका प्रशासनाला दिलेल्या निवेदनात पुढे नमुद केले आहे की, सध्या सर्वत्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्यामुळे मागील काही दिवसांपासून शहरातील उद्योग धंदे बंद आहेत. लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे, पालिका हद्दीतील गाळ्यांचे सन 2020 या आर्थिक वर्षाचे कर माफ करावे, उद्योगधंदे नसल्यामुळे लोकांचे आर्थिक नुकसान झालेले असल्यामुळे शहरातील 2020 या आर्थिक वर्षातील घरपट्टी, पाणीपट्टी माफ करावी तसेच पावसाळा सुरु होण्यापूर्वी शहरातील रस्त्यांची डागडुजी करावी, अशा विविध मागण्या समाजवादी पार्टीचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार, तालुकाध्यक्ष फैयाज कुरेशी, शहराध्यक्ष इम्रान इराणी, वसीम शेख आदींनी निवेदन देऊन केल्या आहेत.  
                
                

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post