Shrirampur : स्व.ससाणे यांच्या दूरदृष्टीने स्वच्छ व हरित श्रीरामपूर संकल्पना साकार ; आ.कानडे, तुळजा फाऊंडेशनच्यावतीने वृक्षारोपण

साईकिरण टाइम्स ब्युरो, 8 जून 2020
श्रीरामपूर | झाडे लावा झाडे जगवा ही संकल्पना काळाजी गरज बनली असल्याचे  आमदार लहू कानडे यांनी म्हटले आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त तुळजा फाऊंडेशनच्या वतीने श्रीरामपूर शहरात वृक्षारोपण आमदार कानडे आणि युवा नेते उपनगराध्यक्ष करण ससाणे यांच्या हस्ते झाले.

               शहरातील हिंदसेवा मंडळाचे भि.रा.खटोड कन्या विद्यालय आणि महाराष्ट्र सेवा मंडळाचे पटेल हायस्कूल मध्ये वृक्षरोपण करण्यात आले.यावेळी बोलताना कानडे म्हणाले की, श्रीरामपूर शहरात तालुक्याचे भाग्यविधाते माजी आमदार स्व.जयंतराव ससाणे यांच्या संकल्पनेतुन स्वच्छ श्रीरामपूर, हरित श्रीरामपूर ही योजना यशस्वी झाल्याने आज शहरात चौफेर हिरवेगार झाले आहे. जॉगिंग ट्रॅक असो अथवा विविध मैदान याभोवती असलेले सुंदर झाडे याचे उत्तम उदाहरण आहे. तुळजा फाऊंडेशन हे सर्वसमावेशक कार्य करत असुन सामाजिकते बरोबरच पर्यावरणाचे रक्षण करीत असल्याचे आ.कानडे यांनी म्हटले आहे.

     यावेळी करण ससाणे म्हणाले की, करोना आजाराने आपल्या सर्वांना संदेश दिला आहे की, पर्यावरण रक्षण काळजी गरज आहे. निसर्गाशी केलेला दुरावा त्यामुळे गेल्या काही वर्षात अनेक नैसर्गिक आपत्तीला आपल्याला सामोरे जावा लागले त्यामुळे आपली जबाबदारी समजून प्रत्येकाने पर्यावरण संरक्षण करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

           यावेळी बाजार समितीचे माजी सभापती सचिन गुजर, शहराध्यक्ष संजय छल्लारे, माऊली प्रतिष्ठाचे ज्ञानेश्वर मुरकुटे, जेष्ठ नगरसेवक दिलीप नागरे, मनोज लबडे, रितेश रोटे पाटील, सुहास परदेशी, हिंदसेवा मंडळाचे मानद सचिव संजय जोशी, भि. रा खटोड कन्या विद्यालयाचे चेअरमन अशोक उपाध्ये, अँड. विलास थोरात अनिल भनगडे, विद्यालयांचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post