आमदार साहेब.....श्रीरामपूर तालुक्यातील 'हा' रस्ता दुरुस्त करा; आरपीआयच्या कार्यकर्त्यांची मागणी

साईकिरण टाइम्स ब्युरो, 18 जून 2020
बेलापूर  ( प्रतिनिधी  ) दमदार पावसामुळे श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर बु. ते वळदगाव या रस्त्याची अतिशय दयनिय अवस्था झाली असुन आमदार निधीतुन हा रस्ता दुरुस्त केला जावा, अशी मागणी आरपीआयच्या कार्यकर्त्यानी केली आहे.

               आरपीआयच्या वतीने प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, जोरदार झालेल्या पावसामुळे या रस्त्याची अवस्था अतिशय खराब झाली असुन शेतकऱ्यांना शेतीवर जाण्यासाठी याच रस्त्याने जावे लागते पावसामुळे या रस्त्याने पायी चालणेही अवघड झाले असुन आमदार लहु कानडे यांनी या रस्त्यास निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी रमेश अमोलीक, विश्वासराव अमोलीक, राजेश अमोलीक,  दिपक अमोलिक यांनी केली आहे. 

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post