साईकिरण टाइम्स ब्युरो, 18 जून 2020
बेलापूर ( प्रतिनिधी ) डाळींब उत्पादकांना शासनाने फळबाग विमा योजनेंतर्गत तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी, डाळींब उत्पादक शेतकरी रविंद्र खटोड यांनी केली आहे.
प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात खटोड यांनी म्हटले आहे की, शासनाने डाळींब उत्पादकांना दिलासा देण्यासाठी फळबाग पिक विमा योजनेंतर्गत नुकसान भरपाई दिलेली आहे; परंतु राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा मंडल मधील शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई मिळालेली नाही.केवळ देवळाली प्रवरा मंडल मधील शेतकरी या लाभापासुन वंचित राहीलेले आहे.
त्यामुळे, या मंडलमधील डाळींब उत्पादक शेतकऱ्यांना पिक विमा आंतर्गत नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी खटोड यांनी केली आहे.