साईकिरण टाइम्स ब्युरो, 20 जून 2020
श्रीरामपूर | गरीब कल्याण योजनेंतर्गत धान्य दुकानदारा मार्फत वाटप करण्यात आलेल्या धान्याचे प्रति क्विंटल १५० रुपये याप्रमाणे कमिशन दुकानदारांना दिले जाणार असुन अन्न पुरवठा विभागाने तसे आदेश दिले असल्याची माहीती जिल्हाध्यक्ष देविदास देसाई यांनी दिली आहे .
केंद्र शासनाच्या गरीब कल्याण योजनेंतर्गत माहे एप्रिल मे व जुन महीन्यासाठी कार्डधारकांना प्रति व्यक्ती पाच किलो तांदूळ मोफत वितरीत करण्यात आला होता या मोफत वितरीत केलेल्या धान्याचे कमिशन दुकानदारांना तात्काळ देण्यात यावे तसेच कोरोना संकटात काम करणाऱ्या धान्य दुकानदारांना विमा सुरक्षा कवच देण्यात यावे, अशी मागणी आँल महाराष्ट्र फेअर प्राईज शाँपकिपर्स फेडरेशनने केली होती.
या मागणीसाठी संघटना १ जुन पासुन संपावर गेलेली होती मात्र वित्त मंत्री नामदार अजित दादा पवार यांनी संघटनेचे पदाधिकारी गणपतराव डोळसे निवृत्ती कापसे यांच्या बरोबर चर्चा करुन मागण्या मान्य करण्याचे अश्वासन दिले होते. फेडरेशनने मागणी केल्याप्रमाणे अन्न व नागरी पुरवठा विभागाने धान्य दुकानदारांना गरीब कल्याण योजनेंतर्गत मोफत वाटप केलेल्या धान्याचे प्रति क्विंटल १५० रुपये या प्रमाणे कमिशन देण्याचे आदेश दिले असुन स्वस्त धान्य दुकानदारांच्या खात्यावर ही रक्कम जमा करण्यात येणार आहे.
गरीब कल्याण योजनेंतर्गत जिल्ह्यातील जवळपास साडे सहा लाख कुटुंबाना १८८३ धान्य दुकानदारांच्या माध्यमातून मोफत धान्याचे वितरण करण्यात आले आहे धान्य दुकानदारांना कमिशन मिळवुन दिल्याबद्दल फेडरेशनचे अध्यक्ष गजानन बाबर, सचिव बाबुराव ममाणे, खजिनदार विजय गुप्ता, निवेत्ती कापसे, गणपतराव डोळसे , नितीन पेंटर, मुबारक मौलवी आदिंचे अहमदनगर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने अभिनंदन करण्यात येत असल्याचेही देसाई यांनी म्हटले आहे.