साईकिरण टाइम्स ब्युरो, 20 जून 2020
श्रीरामपूर | १५ व १६ जून २०२० च्या मध्यरात्री गावलान खोऱ्यात भारतीय सैन्यावर चीनकडून जो भ्याड हल्ला झाला तसेच भारताचा सिमेलगतचा परिसर बळकवण्याचा आणि युध्दजन्य परिस्थिती निर्माण करण्याच्या निषेधार्थ वर्ल्ड कॉन्स्टीट्यूशन अँड पार्लमेंट असोशिएशन ( डब्ल्यूल्यूसीपीए ) अर्थात जागतिक संविधान संघाने एक ठराव पास करून त्या आशयाचे पत्र भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविले आहे.
भारताच्या पंतप्रधानांना पाठविलेल्या पत्रात डब्ल्यूल्यूसीपीएच्या श्रीरामपूर ( महाराष्ट्र ) चॅप्टरचे अध्यक्ष दत्ता विघावे यांनी चीनने भारतीय सैन्यावर केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध केला असून यापुढे चीनशी सर्व प्रकारचे आर्थिक, राजकीय, व्यापारी संबंध तोडून टाकण्याचा आग्रह केला आहे. तर वर्ल्ड पार्लमेंटच्या माध्यमातून चीनच्या सर्व प्रकारच्या मालावर सामुहीक बहिष्कार टाकणार असल्याचा उल्लेख केला आहे.
चीनने सर्व जगभर कोरोना व्हायरस पसरवून वातावरण व जनजीवन विस्कळीत केले. तसेच या दरम्यान जगभर पांगलेल्या भितीचा गैरफायदा घेऊन जगाला युध्दाच्या घाईत लोटण्याचा जो कुटील डाव आखला आहे. त्यालाही जशास तसे ठोस उत्तर देऊन चीनी ड्रॅगनच्या नांग्या ठेचण्याचे आवाहनही सदर पत्रात दत्ता विघावे यांनी मा.पंतप्रधानांना केले आहे.