साईकिरण टाइम्स ब्युरो, 1 जून 2020
नेवासा (दादा दरंदले) : विजेच्या कडकडाटासह नेवासा तालुक्यात सोमवारी मध्यरात्री पावसाने जोरदार सुरुवात झाली. नेवासा तालुक्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली झालेल्या पावसाने नागरिकामध्ये आनंदाचे वातावरण दिसत होते. जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात वरूण राजाने हजेरी लावली.
रात्री 12 वाजण्याच्या सुमारास विजेच्या कडकडाटात जोरदार पावसास सुरवात झाली. तालुक्यात अनेक ठिकाणी वरून राजाने हजेरी लावल्याने शेतकर्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. तालुक्यातील अनेक गावात पावसाचे जोरदार आगमन झाले आहे. काही ठिकणी सोमवारी रात्री पावसास सुरुवात झाली तर काही ठिकाणी पहाटे पाऊस झाला.
वरूनराजाच्या आगमनाने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांमध्येही उत्साहाचे वातावरण पहावयास मिळत होते. उकाड्यापासून नागरिकांना सुटका मिळाली आहे. रविवारी दिवसभर वातातावरण ढगाळ होते.सोमवारी मध्यरात्री पाऊस झाल्याने नागरिकांमध्येही उत्साहाचे वातावरण पहावयास मिळत आहे.
गेल्या चार पाच वर्षात पहिल्यांदाच जूनच्या सुरुवातीस पाऊस झाला आहे. वेळेवर पाऊस झाल्याने मशागत करणे सोपे होईल. यावर्षी चांगला पाऊस होईल अशी आशा वाटते आहे.
- जनार्धन राजळे
शेतकरी , लोहोगाव.