लॉकडाऊन काळातही मुळा एज्युकेशन सोसायटीचे सर्व महाविद्यालय व शाळा ऑनलाईन सक्रिय ; संस्थेचा गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर

साईकिरण टाइम्स ब्युरो, 1 जून 2020
सोनई (दादा दरंदले) लॉकडाऊन काळात शासनाने महाविद्यालयातील प्राध्यापक व सर्व शिक्षकांना 'वर्क फ्रॉम होम' चे आदेश दिलेले होते. संस्थेचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना विषयी काय काळजी घ्यावी व त्याची जनजागृती करण्यासंदर्भात कोणत्या उपाय योजना कराव्यात त्यावर चर्चा झाली. लॉकडाऊन काळातही विद्यार्थ्यांचे शिक्षण अखंडित सुरू  राहावे यासाठी संस्थेचे पदाधिकारी , प्राचार्य यांनी सुयोग्य नियोजन केले , त्यामुळे विद्यार्थ्यांचे शौक्षणिक नुकसान टळले  आहे. संस्थेचे वरिष्ठ महाविद्यालये, फार्मसी महाविद्यालये , कृषी महाविद्यालये अनेक विविध शौक्षणिक व सामाजिक उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचे शिक्षण निरंतर सुरू ठेऊन कोरोना रोगाविषयी जागृती निर्माण केली. या काळात ऑनलाईन घेण्यात आलेल्या विविध  उपक्रमांच्या छटा पुढील प्रमाणे राहिल्या.

                  कोरोना आजारावर ऑनलाईन प्रश्नमंजुषा, उन्नत भारत अभियान अंतर्गत दत्तक घेतलेल्या गावांत वेबसाईटवर कोरोना उपाययोजनांची माहिती प्रसिद्ध , ऑनलाइन शिक्षणासाठी व कार्यालयीन कामकाजासाठी गूगल क्लास रूम, वृद्धि अँप, झूम, क्लाउड मीटिंग, गूगल मीट, यूट्यूब चैनल, ट्विटर, टेलीग्राम, इंस्टाग्राम इत्यादी अँपची माहिती विद्यार्थी व कर्मचारी वर्गात उपलब्ध करुन दिली व त्याद्वारे अनेक शौक्षणिक उपक्रम, ऑनलाइन टीचिंग, सराव परीक्षा, गृहपाठ व प्रशासकिय कामे साध्य केलीत, विद्यार्थ्यांचे व्हाट्स एप ग्रुप तयार करुन शिक्षकांनी स्वनिर्मित ई - कंटेंट विद्यार्थ्यांमार्फ़त  पोहचवन्यात आले व यूट्यूब वर अपलोड केले, ओपन बुक टेस्ट, गूगल फॉर्म द्वारे बहुपर्यायी सराव परीक्षा, ऑनलाइन मौखिक व परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांच्या शंकेचे निरसन करण्यात आले, अनेक शिक्षकांनी ऑनलाइन सेमिनार, लेक्चर सीरीज, फेसबुक, लाईव, यूट्यूब लाईव, फेसबुक चॅट पार्टिमधुन राष्ट्रीय, आंतराष्ट्रीय सेमिनारमधे सहभाग नोंदवून संशोधन लेख सादर केल, विद्यार्थ्यांनी IIC व MHRD अंतर्गत उद्योजक्ता या विषयावर आधारित कार्यक्रमांन्त ऑनलाइन सहभाग नोंदविला व मास्क तयार करुन त्याचे मोफत वाटप केले. एसीई अँकडमी औरंगाबाद यांनी जिनिवो एजुकेशन लर्निंग प्लँटफॉर्मद्वारे विद्यार्थ्यांनसाठी लाईव ऑनलाइन  क्लासेस घेतले व त्याचा विद्यार्थ्यांना खुप फायदा झाला. एसीई अँकडमी औरंगाबाद या शाळेचे ऑनलाइन क्लासेससाठीचे रजिस्ट्रेशन भारतात सर्वाधिक झाले आहेत. यश संवाद द्वारे विविध विषयावरिल व्याख्याने आयोजित करुन विद्यार्थ्यांचे ज्ञान व मनोबल विकसित केले. शासनाचे/विद्यापीठाचे निर्णय कर्मचारी व विद्यार्थ्यांना पाठवले, क्रीड़ा विषयक जनजागृतिवर ऑनलाइन परीक्षा आयोजित केली Online Faculty Awareness Program on NAAC हा कार्यक्रम आयोजित केला सहभागी शिक्षक, विद्यार्थी व इतर व्यक्तिना प्रमाणपत्र दिले, इ.11 वी चा निकाल महाविद्यालयाने संकेत स्थळावर प्रसिद्ध केला, स्कॉलरशिपची कामे ऑनलाइन पद्धतीने केली, रोटेशन पद्धतीने फॉर्मवरिल कामे, पशुसंवर्धन वृक्षसंवर्धन केले.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post