साईकिरण टाइम्स ब्युरो, 1 जून 2020
श्रीरामपूर (प्रतिनिधी) कोरोना महामारीने जगामध्ये सर्वत्र थैमान घातले असताना एकीकडे सर्व काही लॉकडाऊन झाल्याने लोक हवालदिल झाले आहेत तर दुसरीकडे कोरोनामुळे लोकांचे इतर आजार जवळपास गायब झाले आहेत. मोठे हॉस्पिटल्स ओस पडले आहेत. वाहतूक बंद झाली असल्याने लोकांना सक्तीने घरात आराम करावा लागला आहे. आराम केल्यामुळे शरीराला विश्रांती मिळाली त्यातून बरेचसे आजार गायब झाले आहेत. रस्त्यावर वाहने नसल्यामुळे धुराचे प्रमाण लक्षणीय घटले असून प्रदूषण मुक्त वातावरण तयार झाले आहे. त्यातून सुद्धा बरेच आजार नाहीसे झाले आहेत. हॉटेल आणि इतर खाद्य पदार्थांची दुकाने बंद असल्यामुळे मसाल्याचे पदार्थ खाण्यात न आल्याने सुद्धा अनेकांना वेगवेगळ्या आजारापासून मुक्ती मिळाली आहे. प्रवास नसल्याने अपघाताचे प्रमाण कमी झाले असून अपघातामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण देखील घटले आहे. वेगवेगळे रोगांच्या विशेष वैद्यकीय सेवा देणार्यांना सुद्धा आराम मिळाला आहे.
एकीकडे कोरोनाने लोकांना रोजगारापासून वंचित ठेवले आहे तर दुसरीकडे आजारापासून देखील लोक मुक्त झाल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला मोठी बाजारपेठ मिळाली नसली तरी सदरचा शेतमाल गावा गावात आणि छोट्या शहरात गल्ली गल्ली मध्ये थेट विकला जात असल्याने लोकांना स्वस्त मध्ये भाजीपाला, फळे उपलब्ध झाली आहेत तर शेतकऱ्यांना सुद्धा दोन पैसे जास्त मिळाले आहेत.आडते व दलाल यांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.
सतत घरात आराम केल्याने पालक मात्र आपल्या मुलांना वैतागले आहेत. शाळा कधी सुरू होणार याची ते वाट पाहत आहेत. बर्याच दिवसांनी बंद असलेली बाजारपेठ सुरू झाल्यामुळे घरात बसून कंटाळलेल्या लोकांनी गाड्यांवर फेरफटका मारून बाजारपेठेत गर्दी केल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. पोलिस यंत्रणेवर मात्र कोरोनाचा मोठा ताण पडला आहे. इतर वेळी एका ठिकाणी बसून तासन-तास गप्पा मारणाऱ्यांना बंदोबस्तामुळे आता सर्वत्र फिरावे लागत आहे. रात्रंदिवस ड्युटी करावी लागत आहे कोरोणामुळे सभा, समारंभ बंद झाल्यामुळे पुढाऱ्यांची मात्र थोडीशी पंचायत झाली आहे. त्यांना कोणी विचारेना असे झाले आहे. आणि पुढाऱ्याशिवाय सुद्धा गाव गाडा चालू शकतो याची प्रचिती सुद्धा येत आहे.
लग्न समारंभाची मजा निघून गेली असून बँडवाले, आचारी यांचे मात्र काहीसे हाल झाले आहेत. परंतु दुसरीकडे अनावश्यक खर्चाला आळा बसला आहे. त्यामुळे लग्नकार्य करणाऱ्यांची मोठी बचत ही झाली आहे. मंगल कार्यालयाचे मालक मात्र अडचणीत सापडले आहेत. इथून पुढे सर्वांनी कमी लोकांमध्ये लग्न लावायची सवय करून घेतली पाहिजे अशी चर्चा सर्वत्र होत आहे.एकूणच कोरोनामुळे सर्व प्रकारच्या अनेक बाबींना आळा बसला असून समाजातील अनेक चालीरीती, प्रथा बदलण्याची वेळ आता आली आहे. भविष्यकाळात मोठे समारंभ होणार नाहीत असे दिसून येत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे विनाकारण धावपळ करून स्वतःचे जीवाचे हाल करून घेण्याची काही गरज नाही अशी एक फार मोठी शिकवण कोरोणामुळे मिळाली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये समाधान दिसून येत आहे.