Ahmednagar : प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना रक्कम आजपासून वर्ग होणार ; पैसे काढण्यासाठी गर्दी न करता एटीएम अथवा बँक मित्राचा वापर करावा

साईकिरण टाइम्स ब्युरो, 5 जून 2020
अहमदनगर | प्रधानमंत्री जनधन योजनेत खाती उघडलेल्‍या सर्व महिला खातेदारांच्‍या खात्‍यावर तीन महिने (एप्रिल, मे आणि जुन 2020) प्रति महिना रुपये पाचशे इतकी रक्‍कम प्रधान मंत्री गरीब कल्‍याण योजनेअंतर्गत जमा करण्‍यात येणार होती. यानुसार जून महिन्‍याची रक्‍कम 5 जून 2020 पासून सर्व संबंधित बॅंकेकडे सरकारकडुन वर्ग करण्‍यात येईल. 

           सध्‍या सुरू असलेल्‍या कोविड-19 साथीमुळे बँक शाखामध्‍ये आणि ग्राहक सेवा केंद्रावर गर्दी होऊ नये म्‍हणुन वित्‍त मंत्रालयाच्‍या वित्‍तीय सेवा विभागाने पुढीलप्रमाणे दिवस आणि वेळापत्रक आखुन दिले आहे. या वेळापत्रकाप्रमाणेच खातेदारांनी पैसे काढण्यासाठी यावे अथवा बॅंक मित्र आणि एटीएमचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा अग्रणी बॅंक अधिकारी संदीप वालावलकर यांनी केले आहे. त्यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.

  • दिवस पहिला - 5 जून 2020 - ज्‍या खाते क्रमांकाचा शेवट 0 किंवा 1 ने होतो त्‍या खात्‍यातील रक्‍कम काढता येईल.

  • दिवस दुसरा - 6 जून 2020, ज्‍या खाते क्रमांकाचा शेवट 2 किंवा 3 ने होतो त्‍या खात्‍यातील रक्‍कम काढता येईल.

  • दिवस तिसरा - 8 जून 2020, ज्‍या खाते क्रमांकाचा शेवट 4 किंवा 5 ने होतो त्‍या खात्‍यातील रक्‍कम काढता येईल.

  • दिवस चौथा - 9 जून 2020, ज्‍या खाते क्रमांकाचा शेवट 6 किंवा 7 ने होतो त्‍या खात्‍यातील रक्‍कम काढता येईल.

  • दिवस पाचवा - 10 जून 2020, ज्‍या खाते क्रमांकाचा शेवट 8 किंवा 9 ने होतो त्‍या खात्‍यातील रक्‍कम काढता येईल.

            कृपया अफवांना बळी पडु नका. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्‍यासाठी खातेदारांनी एकाच दिवशी बँकेत पैसे काढण्‍यासाठी गर्दी न करता बँक मित्र किंवा एटीएमचा वापर करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.  

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post