साईकिरण टाइम्स ब्युरो, 4 जून 2020
श्रीरामपूर | केंद्र सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या वर्षपूर्तीनिमित्त केंद्र सरकारच्या वतीने गेल्या सहा वर्षात राबविण्यात आलेल्या योजनांची माहिती समाजातील प्रत्येक नागरिकांनपर्यंत पोचविण्यासाठी श्रीरामपूर भाजपाच्या शहर व तालुक्यातील बुथ प्रमुखांच्या बैठकीचे आयोजन उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले होते.
बैठकीच्या प्रारंभी स्व.गोपीनाथरावजी मुंडे यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्यात आले .केंद्र शासनाने नागरिकांसाठी राबविलेल्या तीन तलाख समाप्त करण्यासाठी कायदा करणे , घटनेचे 70 कलम रद्द करणे , आयोध्या येथे श्रीराम मंदिराचा मार्ग मोकळा करणे , शेजारील देशातील पीडित धार्मिक अल्पसंख्याकांना नागरिकत्व देण्यासाठी कायद्यात सुधारणा करणे या कामाची इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी नोंद होईल असे प्रतिपादन श्री राजेंद्र गोंदकर यांनी यावेळी केले. या योजनांनी माहिती व्यक्तिगत संपर्क डिजिटल , संपर्क तसेच व्हर्च्युअल संवादाद्वारे जनतेपर्यंत पोहोचविणार आहे.
याप्रसंगी ज्येष्ठ नेते शशिकांत कडुसकर , तालुकाध्यक्ष सुनील वाणी, बबन मुठे ,गणेश राठी ,अनिल भनगडे, अरुण धर्माधिकारी प्रकाश उंडे, मिलिंद साळवे, विशाल अंभोरे, विशाल यादव, आदींनी मनोगत व्यक्त केले तर मारुती बिंगले ,सतीश सौदागर ,रामभाऊ तरस, बाळासाहेब आहिरे ,अशोक पवार ,सुनील दिवटे, प्रफुल्ल डावरे ,महेश खरात ,सौरभ खरात ,अरुण शिंदे ,विजय लांडे, संजय यादव ,अक्षय वर्पे ,शिवाजी सूर्यवंशी ,शेखर आहेर, डॉ. ललित सावज, राहुल अस्वले ,आदेश मोरे, अक्षय नागरे ,मच्छिंद्र हिंगमिरे, अमोल मावस ,राजेंद्र सौदागर ,अमित मुथा, विवेक देशमुख , आनंद बुधेकर, प्रफुल्ल रावत, राहुल पवार ,रुपेश हरकल ,सुहास पंडित, निलेश खंडागळे, रवी पंडित, विश्वनाथ गवळी, ओमकार झिरंगे ,बाबूलाल शर्मा ,सोनू गौतम ,जनार्दन सोनवणे, संतोष सौदागर, दादासाहेब शेरकर, ताराचंद खंडागळे, सुनील भारस्कर, राहुल जाधव ,संकुल गायकवाड ,आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका अध्यक्ष सुनील वाणी यांनी केले आभार प्रफुल डावरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सतिश सौदागर , विशाल अंभोरे , विजय लांडे , बाळासाहेब आहिरे आदींनी प्रयत्न केले