नगर जिल्ह्यात कोरोना चौथ्या गीअरवर ; कोरोना बाधितांच्या संख्येत होतेय झपाट्याने वाढ

साईकिरण टाइम्स ब्युरो, 25 जून 2020
अहमदनगर | अहमदनगर जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. जिल्ह्यात 24 तारखेला तब्बल 24 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाल्याने कोरोना चौथ्या गीअर वर पोहोचला आहे. कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींचा वेग वाढल्याने प्रशासनासह जिल्हावासियांची चिंता वाढली आहे. 

             बुधवारी (दि. 24) दिवसभरात तब्बल 24 कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींची भर पडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली  आहे. बुधवारी  5 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तर दिवसभरात २४ कोरोना रुग्णांची भर पडली. त्यात नगर शहरातील  18,  संगमनेर 4,  जवळके (जामखेड) आणि श्रीरामपूर प्रत्येकी एक रुग्ण आढळून आले आहेत. 90  जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आत्तापर्यंत जिल्ह्यातील बरे झालेले  २५४ रुग्ण आहे तर ॲक्टिव रुग्णांची संख्या 62 आहे. 

            अहमदनगर शहरातील तोफखाना सिद्धार्थनगरसह शहरातील विविध भागात जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी मनपा आयुक्त श्रीकांत मायकलवार, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके आणि महापालिका अधिकारी यांच्यासह भेट देऊन पाहणी केली. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना बाबत त्यांनी सूचना दिल्या. कोरोना प्रादुर्भाव वाढू नये यासाठी आवश्यक उपाय योजना करण्याच्या सूचना त्यांनी मनपा आणि पोलिस यंत्रणेला दिल्या. तसेच नागरिकांनीही सार्वजनिक संपर्क टाळावा,आजाराची लक्षणे जाणवत असतील तर आरोग्य यंत्रणेशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन केले.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post