साईकिरण टाइम्स ब्युरो, 20 जून 2020
श्रीरामपूर | काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ व शहर व तालुका काँग्रेस कमिटी यांच्या वतीने मास्क, हॅन्ड ग्लोजचे वाटप आमदार लहू कानडे यांच्या हस्ते करण्यात आले.
श्रीरामपूर नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष करण ससाणे यांच्या हस्ते सेनीटायझर मशीन चे वाटप करण्यात आले. काँग्रेस नेते खा.राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर श्रीरामपूर काँग्रेसच्या वतीने आज शहरात साखर कामगार हॉस्पिटल, पोलीस स्टेशन, नगरपरिषद दवाखाना याठिकाणी सेनीटायझर मशीन भेट म्हणून देण्यात आले.
यावेळी आमदार कानडे उपनगराध्यक्ष ससाणे यांनी साखर कामगार हॉस्पिटलच्या विश्वस्तशी चर्चा केली. यावेळी आमदार कानडे म्हणाले की, साखर कामगार हॉस्पिटल हे श्रीरामपूर तालुक्याचे वैभव असून हॉस्पिटलमकरिता सर्वतोपरी मदत करणार असल्याचे जाहीर केले.
या प्रसंगी, जेष्ठ नेते जी.के.पाटील, मार्केट कमिटीचे माजी सभापती सचिन गुजर, जिल्हा परिषदेचे बाबासाहेब दिघे, शहराध्यक्ष संजय छल्लारे, माऊली प्रतिष्ठानचे ज्ञानेश्वर मुरकुटे, नगरसेवक दिलीप नागरे, मनोज लबडे, रितेश रोटे, शशांक रासकर, माजी नगरसेवक याकुबभाई बागवान, मुन्ना पठाण, निलेश नागले, बापू गिरमे, कॉम्रेड आण्णा पाटील थोरात, कामगार हॉस्पिटलचे ट्रस्टी अविनाश आपटे, ज्ञानदेव आहेर, भिमराज देवकर, डॉ.रवींद्र जगधने, दिपक पवार आदी मान्यवर उपस्थित होते.