साईकिरण टाइम्स ब्युरो, 4 जून 2020
उक्कलगाव | प्रतिनिधी | काल झालेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या प्रभावाने श्रीरामपूर तालुक्यालाही फटका बसला. शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने लावलेल्या फळबागांचे नुकसान झाले आहे. सोसाट्याच्या वाऱ्याने अनेक ठिकाणी शेतीतील उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले. काही ठिकाणी डाळिंब, लिंबाचे झाडे उन्मळून पडली होती. सुदैवाने काही जीवितहानी झाली नाही. वाऱ्याच्या वेगाने फळे गळून पडली.
काल पहाटेच्या सुमारास झालेल्या चक्री वादळाने डाळिबांचे क्षेत्र असणार्या पुरुषोत्तम थोरात यांच्या शेतातील डाळिबांचे झाडे उन्मळून पडली. या सुसाट वाऱ्याने डाळिबांचे फळे गळून पडली होती. कालच्या चक्रीवादळाच्या प्रभावाने तालुक्यातील एकलहरे शिवारातील आठवाडीत येथे रामकाठी झाड कोसळून त्याखाली आप्पासाहेब शिंदे यांच्या स्विफ्ट कारचे मोठे नुकसान झाले.
निसर्ग चक्रीवादळामुळे अनेक झाडे उन्मळून पडले. त्यामुळे वीजपुरवठाही खंडित झाला होता. चक्रीवादळातच पावसाच्या हलक्या सरी पडत होत्या. सुसाट वाराने अनेक पिकेही जमीनदोस्त उध्वस्त झाली. रात्री उशिरा पर्यत पावसाच्या सरीत पडत होत्या. श्रीरामपूरचे तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या आदेशावरून चक्री वादळामुळे काल झालेल्या नुकसानीची पिकांची पाहणी, तलाठी इमानदार, सहाय्यक नंदु बोबंले हे शेतकर्यांच्या समवेत पाहणी करीत होते. सुदैवाने काही ठिकाणी घराजवळील बाजूसच झाडे उखडून पडले त्यात काही जीवितहानी झाली नाही. येथील परिसरात वार्याचा वेग अधीक जास्त होता या परिसरात समाधानकारक पाऊस झालेला असल्याने, कपाशी,सोयाबीन,मका,उस, दिलासा मिळाला आहे. तीन दिवसांपासून सुरूच असल्याच्या पावसाने खरीप हंगामाची लगबग सध्या सुरू आहे. आधीच कोरोनाच्या महामारीमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांचे, निसर्ग चक्रीवादळाने फळबागांचे, पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.