साईकिरण टाइम्स ब्युरो, 8 जून 2020
श्रीरामपूर | पोस्ट ऑफिस मध्ये बंद असलेले आधारकार्ड केंद्र चालू करा, अशी मागणी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी खासदार सदाशिव लोखंडे आणि आमदार लहू कानडे यांच्याकडे केली आहे.
मागील अनेक दिवसांपासुन पोस्ट ऑफिसमध्ये चालू असलेले आधारकार्ड केंद्र बंद झाले आहे. कुठेतरी एका खाजगी ठिकाणी सदरचे केंद्र चालू असल्याने नागरिकांचे मोठे हाल होत आहे.
सध्या सर्वसामान्य जनतेला नविन आधारकार्ड, अथवा आधारकार्ड मध्ये दुरूस्ती कारणेकरिता हेलपाटे मारावे लागत आहे. त्यामुळे ससाणे यांनी लोकप्रतिनिधीशी संपर्क साधला. यावर खासदार लोखंडे आणि आमदार कानडे यांनी, संबंधीताशी बोलून त्वरित पोस्ट कार्यालयात बंद असलेले आधारकार्ड केंद्र चालू करण्याच्या सूचना केल्या आहे. त्यामुळे जनतेचे होत असलेले हाल थांबणार आहेत.