केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात श्रीरामपूर काँग्रेसचे निवेदन ; मोदी सरकार दरवाढ सरकार असल्याचा आरोप

साईकिरण टाइम्स ब्युरो, 25 जून 2020
श्रीरामपूर | केंद्रातील मोदी सरकारचे सर्व स्तरावरील अपयश जनतेसमोर आणण्यासाठी प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या सूचनेनुसार श्रीरामपूर काँग्रेसच्यावतीने मोदी सरकार दर वाढ सरकार, मोदी सरकार आश्वासन सरकार या शिर्षकाखाली  आमदार लहू कानडे व उपनगराध्यक्ष करण ससाणे यांच्या नेतृत्वाखाली प्रताधिकारी व  तहसीलदारांना निवेदन देऊन केंद्र शासनाचा निषेध करण्यात आला.

         दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्रातील मोदी सरकारला जवळपास सहा वर्षे पूर्ण झाले या सहा वर्षात मोदी सरकारने जनतेला खोटी आश्वासन देऊन सर्वसामान्य जनतेची दिशाभूल केली आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी, हमीभाव दिला नसून उलट देशातील मोठ्या उद्योजकांचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज माफ केले आहे. जागतिक बाजारपेठेत कच्चा तेलाचे भाव कमी असतांना देशात पेट्रोल, डिझेल ची झालेली दरवाढ त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची लूट सरकार करत आहे.

       कोरोनाच्या संकटामुळे अनेक होतकरु व गरजू तरुणांना व मजुरांना आपला रोजगार गमवावा लागला आहे. त्यामुळे काँग्रेस अध्यक्षा खासदार सोनिया गांधी यांच्या मागणीप्रमाणे गरिबांना सप्टेंबर २०२० पर्यत अन्नधान्य मोफत देण्यात यावे आणि मनरेगा अंतर्गत असलेल्या  कामांचे  दिवस शंभर ऐवजी दोनशे दिवस करण्यात यावे अशी मागणी निवेदनात केली आहे.

          निवेदनावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सचिन गुजर, तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक, शहराध्यक्ष संजय छल्लारे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाबासाहेब दिघे, ज्ञानेश्वर मुरकुटे, जिल्हा प्रतिनिधी बाबासाहेब कोळसे, सतीश बोर्डे,  संजय बढे, मनोज श्रीगोड आदींच्या सह्या आहेत. 

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post