साईकिरण टाइम्स ब्युरो, 10 जून 2020
श्रीरामपूर | राज्य सरकारने बंदी घातलेली असतानाही शहरासह तालुक्यात सर्रासपणे गुटखा विक्री होत असून त्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी समाजवादी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी अप्पर पोलीस अधीक्षकांकडे निवेदन देऊन केली आहे.
याबाबत समाजवादी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनाला दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे की, कायद्याने प्रतिबंधित असलेल्या पदार्थाचे उत्पादन, वाहतूक व साठ्यावर बंदी घातलेली असतानासुद्धा शहरासह तालुक्यात गुटखा व सुगंधी तंबाखू मोठ्या प्रमाणात विकला जात आहे. त्यामुळे, संबंधितावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी समाजवादी पार्टीचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष जोएफ जामदार, तालुकाध्यक्ष फैय्याज कुरेशी, शहराध्यक्ष इम्रान इराणी आदींनी केली आहे.