साईकिरण टाइम्स ब्युरो, 9 जून 2020
अकोले | अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा भागात राहणारे शेतकरी दशरथ श्रीपाद फलके यांच्या पत्नी सौ. शुभांगी दशरथ फलके तसेच वडील श्रीपाद फलके यांना फिर्यादचे वडिलोपार्जित जमीन वाटपाच्या कारणावरून तुझ्या वाटपाची जमीन आम्ही पूर्वीपासून करत असून तुला देणार नाही. त्यात आम्ही रोटर मारू नाहीतर काहीही करू असे म्हणत आरोपी भाया, पुतणे व जाव यांनी बेदम मारहाण करून कुऱ्हाडीने वार करून जखमी केले.
सासरे श्रीपाद यांना ढकलून दिले. लाथाबुक्क्याने मारले. शिवीगाळ केली दशरथ फलके हे गंभीर जखमी झाले. त्यांच्या पत्नी सौ. शुभांगी दशरथ फलके यांच्या फिर्यादीवरून आरोपी गौरव पोपट फलके, सागर पोपट फलके, पोपट फलके, मनीषा पोपट फलके (सर्व राहणार -मुळवे, ब्राम्हणवाडा ) यांच्याविरुद्ध अकोले पोलीस ठाण्यात भादंवि कलम 326, 323, 504, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सकाळी 9 वाजता ही मारहाण झाली. पोलीस निरीक्षक जोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉनस्टेबल टोपले पुढील तपास करत आहेत.
Tags
क्राईम