Shrirampur : विदेशी मालासह ऑनलाईन खरेदीवर बंदी घाला ; करण ससाणे, काँग्रेस नगरसेवकांचे प्रशासनाला निवेदन

साईकिरण टाइम्स ब्युरो, 10 जून 2020
श्रीरामपूर | चायनासह विदेशी मालावर बंदी घालून ऑनलाईन  खरेदीवर निर्बंध  घालण्याची मागणी उपनगराध्यक्ष करण ससाणे आणि काँग्रेस नगरसेवकांनी तहसीलदारांना निवेदन देऊन केली आहे. काँग्रेस नगरसेवकांनी तहसीलदार प्रशांत पाटील यांची भेट घेऊन निवेदन सादर केले आहे.

            निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही महिन्यांपासून कोरोना आजाराने थैमान घातले आहे त्यामुळे अनेक छोट्या मोठे व्यावसायिक अडचणीत सापडले आहे. श्रीरामपूर शहरात देखील तीच परिस्थिती होती. तीन महिन्यांपासून बरचसे उद्योजक, व्यापारी अडचणीत सापडले आहे. ज्या व्यापारी व व्यावसायिकांनी अडचणीच्या काळात आपल्याला साथ दिली आता अश्या व्यापाऱ्यांना साथ देणेकरिता श्रीरामपूर शहरात चिनीसह विदेशी वस्तू आणि ऑनलाईन खरेदीवर पूर्णपणे त्वरित बंदी घालावी जेणेकरुन आर्थिक अडचणीत सापडलेले स्थानकि व्यावसायिकांना व व्यापाराला चालना  मिळेल. आणि व्यापाऱ्यांची विस्कटलेली घडी सुरळीत होण्यास मदत होईल.

              निवेदनावर उपनगराध्यक्ष करण ससाणे,  माजी नगराध्यक्ष अनिल कांबळे, पक्षप्रतोत संजय फंड, शहराध्यक्ष संजय छल्लारे, नगरसेवक दिलीप नागरे, मुज्जफर शेख, श्रीनिवास बिहाणी, मनोज लबडे, शशांक रासकर, रितेश रोटे पाटील, सुहास परदेशी आदींच्या सह्या आहेत.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post