न्यु इंग्लिश स्कूल उक्कलगाव विद्यालयात सहविचार सभा पार पडली

साईकिरण टाइम्स ब्युरो, 26 जून 2020
उक्कलगाव | प्रतिनिधी | न्यू इंग्लिश स्कूल उक्कलगाव विद्यालयात शालेय व्यवस्थापन समिती व शिक्षक पालक सहविचार सभा नुकतीच पार पडली. 

             कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करण्याविषयी ही सहविचार सभा घेण्यात आली होती. यासह विचार सभेच्या अध्यक्षस्थानी भाऊसाहेब रंगनाथ पा.कर्डीले हे होते. ते म्हणाले की,शासनाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे शाळा सुरू करण्यात यावी. शिक्षक,पालक,ग्रामस्थ यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक बाबतीत सतर्क राहून शाळा सुरू करण्यास सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.या मेळाव्या प्रसंगी सुनिल पा थोरात, दिलिप थोरात, नंदकुमार थोरात, मच्छिंद्र जाधव, सुभाष दरदले, विनोद थोरात, विलास जगधने, बाबासाहेब जगधने, दिपक थोरात, गोवर्धन अभंग, जगन्नाथ धनवटे, शरद गोळे, कविता धनवटे,अर्चना गुंजाळ,या पालकांनी सहभाग घेऊन शाळा सुरू करण्याबाबत सहकार्य करण्याचे ठरविण्यात आले.रमेश वलटे, रंभाजी कोळगे, रमेश बोरकर,या शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले.मुख्याध्यापिका सौ सुमती औताडे यांनी पालकांना मोलाचे मार्गदर्शन केले.सूत्रसंचालन संदीप बोरुडे यांनी केले. व आभार प्रदर्शन गणेशराव बंगाळ यांनी केले, कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर सेवक वर्ग यांनी विशेष परिश्रम घेतले.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post