साईकिरण टाइम्स ब्युरो, 26 जून 2020
उक्कलगाव|प्रतिनिधी|श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब- कुरणपूर रस्ता दुतर्फा वृक्ष लागवड कार्यक्रम वनविभाग व रोजगार हमी योजनेअंतर्गत सुरू करण्यात आला. यावेळी सामाजिक वनीकरण श्रीरामपूर परिक्षेत्राच्या वनक्षेत्रपाल परवीन पठाण यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
वनविभागाने वृक्ष लागवडीचे कार्यक्रम हाती घ्यावे, ज्यामुळे झाडांची संख्या वाढेल आणि निसर्गाचा देखील समतोल राहील, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली. वनक्षेत्रधिकारी परवीन पठाण यावेळी बोलताना म्हणाल्या, रस्त्याच्या कडेला शेतकर्यांनी लावलेल्या झांडाची काळजी घेण्याची तसेच शासनाच्या वनविभागाच्या या योजनेला सफल बनविण्यासाठी सर्वाच्या सहकार्याची गरज आहे. या कार्यक्रमास श्रीरामपूरचे वनक्षेत्रपाल अधिकारी परवीण पठाण, नियतक्षेत्राधिकारी संदीप जाधव, गळनिंबच्या संरपच रोहिणीताई जाटे, कुरणपूरचे संरपच शोभाताई चिंधे, ग्रामसेवक आर बी ओहोळ, कुरणपूर ग्रामसेविका श्रीमती पलघडमल मच्छिंद्र चव्हाण, बाळासाहेब कांबळे उक्कलगावचे ग्राम रोजगार सेवक शाम नागरे, बाळासाहेब आहेर, अशोक जिजाबा वडितके, उक्कलगावचे सोसायटीचे चेअरमन पुरूषोत्तम थोरात, गुलाब गाडेकर शिवाजी शिंदे प्रभाकर जाटे, इंजि सोहम चिंधे, तुकाराम शिंदे प्रगतशील शेतकरी सर्जेराव पा थोरात, कैलास थोरात आदी गळनिंब उक्कलगाव कुरणपूर परिसरातील नागरिक उपस्थित होते.