अटी-शर्तीच्या अधीन राहून चित्रपट, मालिकांच्या चित्रीकरणास मान्यता

साईकिरण टाइम्स ब्युरो, 26 जून 2020
मुंबई | राज्य सरकारने काही अटी-शर्तींच्याअधीन राहून चित्रपट, दूरचित्रवाणी, मालिकाच्या मान्यता दिली आहे. यासाठी सरकारकडून 30 मे 2020 रोजी मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आले. मात्र, या मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करताना काही संस्था किंवा संघटनांना अडचणी येत होत्या. त्यामुळेच सांस्कृतिक विभागामार्फत मार्गदर्शक तत्वांबाबतचे स्पष्टीकरण देण्यात आलं आहे 


            “लॉकडाऊनदरम्यान ठप्प झालेली चित्रपटसृष्टीतील कामे पुन्हा सुरु झाले आहेत. राज्य सरकारने काही अटी-शर्तींच्याअधीन राहून चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी मालिकांच्या चित्रीकरणास मान्यता दिली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे मनोरंजन, चित्रपट क्षेत्राला मोठा दिलासा मिळाला आहे”, असं सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख म्हणाले.
           “चित्रपटसृष्टीतील संस्थांनी सर्व सूचनांनुसार कार्यवाही करावी. सर्व निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा सांकेतांक 20200624110937823 असा आहे, अशी सूचना राज्याच्या सांस्कृतिक विभागाकडून देण्यात आली आहे.


मार्गदर्शक तत्वे काय आहेत?

1. चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी यांना 30 मे 2020 च्या शासन निर्णयानुसार चित्रीकरणासाठी परवानगी देण्यात आली आहे. सदर चित्रीकरणाची परवानगी राज्य शासनाने तयार करुन दिलेल्या एस ओ पी (मार्गदर्शक तत्वे) नुसार असेल. लॉकडाऊनपूर्वी चित्रीकरणासाठी शासनाची परवानगी घेण्याची पद्धत यापुढेही तशीच असणार आहे.

2. लॉकडाऊनपूर्वी ज्या पद्धतीने आरक्षण आणि चित्रीकरणाची परवानगी घेण्यात येत होती आताही तीच पद्धत असणार आहे. चित्रीकरण करत असताना संबंधित निर्मात्याने आवश्यक त्या परवानग्या, स्व-घोषित पत्र, चित्रीकणासंबंधित सर्व माहिती चित्रनगरीला लिखित स्वरुपात कळविणे आवश्यक आहे.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post