साईकिरण टाइम्स ब्युरो, 21 जून 2020
उक्कलगाव | भरत थोरात | श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव नजीकच्या पुर्व भागातील पटेलवाडी ते थोरातवस्ती या शिवरस्त्याची पहिल्याच पावसातच अत्यंत दुरावस्था झाली आहे. रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले आहेत. पटेलवाडी ते थोरात वस्ती दोन किलोमीटरचा शिवरस्ता दळणवळणासाठी दृष्टीने अंत्यत महत्वाचा मानला जातो. शेतकऱ्यांनी जिल्हा परिषद सदस्या आशाताई दिघे यांना याबाबत निवेदन देऊन रस्ता करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, जि.प.च्या अर्थ बांधकाम समितीचे माजी सभापती बाबासाहेब दिघे यांनी शेतकऱ्यांना दिलेला शब्द दोन महिन्यात पूर्ण करू, असे आश्वासन दिले.
पटेलवाडी पासुन काही प्रमाणात डांबरीकरण झालेल्या दोन किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर मोठे -मोठे खड्डे पडले. त्यातच तीन ते चार दिवसांपूर्वीच झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्याची चांगलीच वाट लागली आहे. गावापासून चार ते पाच किलोमीटरच्या अंतरावरून थोरात वस्ती नजीकच्या लोकांना गावात दुध,बॅकचे काम, रेशन दुकानातुन धान्य आणण्यासाठी, विशेषतः हा दवाखान्यात जाण्यासाठी या रस्त्याने पायपीट करावी लागते. चिखलामुळे पायी चालणेही मुश्किल होत असल्याची तक्रार शेतकर्यांनी केली. पटेलवाडी ते थोरात वस्ती दोन किलोमीटरचा शिवरस्ता दळणवळणासाठी दृष्टीने अंत्यत महत्वाचा मानला जातो. शिवाय थोरात वस्ती, फुलपगार वस्ती,पारखे वस्ती, जगधने वस्ती आदीसह वाड्यावस्त्यांना जोडणारा जवळचा रस्ता आहे.
रस्त्यावरून शालेय विद्यार्थी,गावात जाणार्या ग्रामस्थांसाठी हा रस्ता सोयीचा पडत असतो पटेलवाडी पासुनच दोन किलोमीटर ओढयानजीकच्या भागापर्यत अत्यंत खराब झाला आहे तर काही रस्ता डांबरी आहे. पावसाने मोठे मोठे खड्डे पडलेले आहे. त्यातुनच दुचाकी, चारचाकी,वाहन चालविणे मुश्किल झाले आहे हा रस्ता त्वरित दुरूस्त करण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
खाऱ्या ओढ्यामुळे पुर परिस्थितीचा धोका
पटेलवाडी पासुन काही जवळच्या अंतरावरील असणार्या खार्या ओढ्यामुळे पुर परिस्थितीत उद्भवत असते. येथीलच थोरात वस्ती जगधने फुलपगार वस्ती पारखे वस्ती व शिवरस्त्यावरील लोकांचा कायमच संपर्क तुटून या वस्त्या पुराच्या पाण्याखाली जातात. त्यामुळे खाऱ्या ओढ्यावर पुलाचे बांधकाम करण्यात यावेत. अशी मागणी शेतकर्यांनी केली.
जिल्हा परिषद सदस्यांना शेतकर्यांनी दिले निवेदन...
पटेलवाडी ते थोरात वस्ती शिव रस्त्याची अतिशय बिकट अवस्था झाली आहे. शालेय विद्यार्थ्यांची आणि शेतकर्यांची मोठी गैरसोय होत आहे. पुलाचे बांधकाम करण्यात यावे. रस्त्यासाठी जि प सदस्यांच्या फंड निधीतून रस्त्याला मंजूरी मिळावी, अशा मागणीचे निवेदन दिले. दरम्यान, यावेळी शेतकर्यांशी बोलतांना जि प चे अर्थ बांधकाम समितीचे माजी सभापती बाबासाहेब दिघे म्हणाले की, रस्त्याच्या बाबतीतही लोकांच्या समस्या जाणुन घेतल्या. तसेच शेतकर्यांना दिलेला शब्द दोन महिन्यातच पुर्ण करू,असे आश्वासन दिघे यांनी ग्रामस्थांना दिले. याप्रसंगी विकास थोरात, बबन निवृत्ती थोरात, विलास थोरात, सोमनाथ मोरे, आनंदा थोरात, सुनिल थोरात, पप्पू पारखे, बन्सी पारखे, प्रदीप थोरात, प्रताप पटारे, गोवर्धन अंभग आदीसह परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.