साईकिरण टाइम्स ब्युरो, 19 जून 2020
श्रीरामपूर |चीनी सैनिकांनी भारतीय सैन्यावर केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेधार्थ भीमशक्ती संघटना व दत्तनगर नागरिकांच्या वतीने चायना वस्तूचा बहिष्कार करून होळी करण्यात आली. यावेळी चीनचा राष्ट्रध्वज जाळून, 'चीन मुर्दाबाद' अशा घोषणा देण्यात आल्या.
यावेळी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यापुढील काळात कोणत्या नागरिकांनी चायना वस्तू घेऊ नये अशी शपथही घेण्यात आली. यावेळी भीमशक्ती जिल्हा अध्यक्ष संदीप मगर, दत्तनगरचे सरपंच सुनील शिरसाठ, सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे, संजय जगताप, ग्रामपंचायत सदस्य किरण खंडागळे, संदीप बागुल, आरपीआय युवक अध्यक्ष राजेंद्र मगर, संजय बोरगे, सुरेश शिवलकर, सचिन खांडरे, संजय थोरात, बबन माघाडे, नयन शिरसागर, इमरान शेख, राहुल कोळगे, सचिन विधाटे, प्रमोद भालेराव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी मगर यांनी, भारताच्या ताब्यात असलेले लगाद येथे चिनी सैनिकांनी आपल्या जवानावर भ्याड हल्ल्याचा भीमशक्ती संघटनेच्यावतीने निषेध केला. या हल्ल्यात 20 जवान शहीद झाले त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. पुढील काळात नागरिकांनी चायना मालावर बहिष्कार टाकावा व चिनी वस्तू विकत घेऊ नये, जेणेकरून चायना आर्थिक दृष्टीने दुर्मिळ होईल. नागरिकांनी स्वदेशी वस्तू घेऊन भारताची आर्थिक परिस्थिती सुधारेल. देश प्रगतिशील होईल असे मगर म्हणाले. यावेळी चीनचा झेंडा जाळून व चीन मुर्दाबाद घोषणा देण्यात आल्या.