साईकिरण टाइम्स ब्युरो, 19 जून 2020
श्रीरामपूर | भारताविरुद्ध पाकिस्तान, नेपाळ यांना चिथावणी देऊन वेगवेगळे कारणे काढून अस्थिरता निर्माण करण्याचा चीनचा डाव कधीही यशस्वी होणार नाही. विश्वासघाताने सीमेवरील सैनिकांवर बेछुटपणे हल्ला केला. यामध्ये काही सैनिक मृत्यू पावलेल्या शहीद सैनिकांना छत्रपती राजे संभाजी चौकात श्रद्धांजली वाहण्यात आली. चीनी मालाची आयात-निर्यात थांबवा, अशी मागणी करून शत्रू राष्ट्राचा झेंडा जाळण्यात आला. यावेळी 'शहीद जवान अमर रहे', 'भारत माता की जय', 'वंदे मातरम' ने परिसर दणाणून निघाला.
भारतीय व्यापाऱ्यांनी सर्व नियमांचे पालन करुन आयत कर भरुन चीनी मालाची आयात केली. आयात केलेला माल हा काही कोट्यावधीच्या आहे. त्या मालावर बहिष्कार घातल्याने व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. केंद्र व राज्य सरकारने आयात करण्यात आलेल्या सर्व मालाची बाजार भावाप्रमाने हा चिनी मला विकत घेऊन त्याची विल्हेवाट लावावी. यामुळे भारतीय व्यापाऱ्यांचे नुकसान होणार नाही, अशी मागणी आम आदमी पार्टीचे उत्तर महाराष्ट्र प्रचार तिलक डुंगरवाल यांनी केली.
यावेळी प्रमुख उपस्थिती कामगार नेते नागेशभाई सावंत ,आम आदमी पार्टीचे उत्तर महाराष्ट्र प्रचारक तिलक डुंगरवाल ,छत्रपती राजे संभाजी चौकाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र भोसले, आपचे तालुकाध्यक्ष विकास डेंगळे, उत्तर जिल्हा प्रवक्ता प्रविण जमधडे, किशोर वाडीले ,राजमहमंद शेख ,राहुल रणपीसे,राहुल केदार, भैरव मोरे , किरण गायकवाड, सलीम शेख दिपक परदेशी दिनेश यादव,गौतम राऊत राजेंद्र जावरे अनिल ढगे,आम आदमी पार्टी मराठा स्वयंसेवक संघ, ह्यूमन राईट असोसिएशन,महाराष्ट्र सर्वेधोग कामगार कर्मचारी युनियन, छत्रपती राजे संभाजी चौक मित्र मंडळाचे कार्यकर्ते सोशल डिस्टिन्सींगचे पालन करुन उपस्थित होते.