नवी दिल्ली | टिकटॉक, हॅलो, शेअर इट, कॅमस्कॅनर, युसी ब्राऊझर सह तब्बल 59 चीनी अँप्सवर भारतात, केंद्र सरकारने बंदी घातली आहे. यातील बहुसंख्य अँप्स अनेकांच्या वापरातील आहेत.
चीनवर हल्लाबोल करण्यास भारत सज्ज झाला आहे. त्या दिशेने भारत सरकारनं एक पाऊल उचललं आहे. चीनचे 59 अॅप्स बॅन करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यामध्ये कमी वेळेत खूप लोकप्रिय झालेल्या टिकटॉक अॅपचाही समावेश आहे. टिकटॉकसह यूसी ब्राऊजर, शेअर इट इत्यादी अॅप्सवर केंद्र सरकारने बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.