साईकिरण टाइम्स ब्युरो, 1 मे 2020
उक्कलगाव | प्रतिनिधी | लम्हाणबाबा शिवारात बिबट्याने धुमाकूळ घातला असतानाच श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथील धनवाट परिसरातील कर्डीले वस्तीनजीक असणार्या थोरात वस्तीवर बिबट्याने धुमाकुळ घालत गोठ्यात बांधलेल्या गाभण शेळीवर झडप घालून शेजारीच असणार्या गिणीत फडफडत नेत गाभण शेळी ठार केली. ही घटना आज शुक्रवारी (दि. 1) रोजी सकाळी सहा ते सव्वा सहाच्या सुमारास धनवाट परिसरातील विकास रामदास थोरात यांच्या वस्तीवर घडली.
बिबटयाने शेळीला गिणीत फडफडत नेत शेळीचे रक्त प्राशन करून शेळीचे अवशेष शिल्लक ठेवून शेजारीच असणार्या मकाच्या शेतात पसार झाला नेमके सदरची घटना सकाळी सकाळीच घडल्याने धनवाट परिसरात एकच खळबळ उडाली आहे नेमके सदरची घटना सकाळी शेतकर्यांनी डोळ्यादेखत हा प्रसंग पाहीला होता त्यांनतर बिबट्या गिणीतुन निघत त्यांच्याच घरासमोरुनच जात मका शेतात जावून दडून बसला आहे त्यांच्या घराबाहेरील अंगणामध्ये बिबट्याचे ताजे ठसे सापडले आहे.
व्हिडीओ पहा
सदरची घडलेली घटना विकास थोरात यांनी वन अधिकाऱ्यांच्या कानावर घातली असता वनसंरक्षक विकास पवार यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली या बिबट्याच्या हल्ल्यात मृत पावलेल्या शेळीचा पंचनामा केला सातत्याने या धनवाट भागातच बिबटयाचा वावर वाढला आहे त्यामुळे या परिसरात हल्ल्याच्या ताज्या घटना घडत आहे बर्याच दिवसांपासून लम्हाणबाबा शिवारासह धनवाट परिसरात बिबटयाचा मुक्त संचार वाढल्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर भीतीचे वातावरण पसरले आहे तर रात्री वेळ असो, किंवा सकाळची वेळ असो, बिबटया शेळया कुत्र्यांचा फडशा पाडत आहे गडाख वस्तीवर व जगधने वस्त्यावरील घटना ताजी असतानाच पुन्हा धनवाट परिसरातील थोरात वस्तीवर तिसरी घटना घडली आहे. वनधिकाऱ्यांनी शेतकर्यांची तक्रार लक्षात घेऊन उक्कलगाव परिसरात नवीन पिंजरे लावण्यात यावेत अशी मागणी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी केली आहे.