साईकिरण टाइम्स ब्युरो, 1 मे 2020
नायगाव | कोरोना या विषाणूचा भारतामध्ये प्रादुर्भाव वाढत असल्याचं दिसत आहे यावरती उपाय योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वस्तरीय प्रशासन करत आहे प्रशासन अंमलबजावणी करत असताना काही ठिकाणी पोलिस यंत्रणेवर हल्ले करण्यात आले ही बाब अतिशय चुकीची आहे दिवस-रात्र आपल्यासाठी पोलीस प्रशासन उभे असून आपण हे कृत्य करणे निंदनीय ठरत आहे त्याचप्रमाणे आरोग्य विभाग या संकटा विरोधात लढत आहे त्यांना सहकार्य करणे आपले कर्तव्य आहे सोशल डिस्टन्स वापर करून तोंडाला रुमाल किंवा मास्क बांधून अत्यावश्यक सेवांचा लाभ घेतला पाहिजे विनाकारण फिरणे टाळले पाहिजे वेळोवेळी सैनिटायझर व डेटॉलचा वापर केला पाहिजे चला तर प्रशासनाला सहकार्य करूया कोराना ला आपल्या देशातून हद्दपार करूया, असे आवाहन पोलीस पाटील राजेंद्र राशिनकर पाटील यांनी केले आहे.