Shrirampur : महाराष्ट्र पोलिसांचे कार्य मानवतावादी ; मुफ्ती रिजवान ; उम्मती फाउंडेशन तर्फे मास्क व सॅनिटायझरचे वितरण

साईकिरण टाइम्स ब्युरो,  1मे 2020
श्रीरामपूर (प्रतिनिधी ) समस्त मानव जातीवर कोरोना विषाणू संसर्गाचे संकट आले असून या आणीबाणीच्या स्थितीतही महाराष्ट्र पोलीस जीवाची पर्वा न करता कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम करीत आहेत. जनतेच्या रक्षणासाठी शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी रात्रंदिवस राबून पोलिस प्रशासन करीत आहे . या संसर्गाचा धोका ओळखून ही प्रत्येकजण राबत आहे. पोलिसांमध्ये सुद्धा सहृदय माणूस असतो याची उदाहरणे या निमित्ताने राज्यभरात अनेक ठिकाणी पाहायला मिळाली .हे अस्मानी संकट असून यासाठी सर्वांनी मिळून प्रार्थना करूया त्याचबरोबर पोलिस प्रशासनाकडून  मिळणाऱ्या  आदेशाचेही पालन करून पोलिसांना सहकार्य करू,  या असे प्रतिपादन मुफ्ती मोहम्मद रिजवानुल हसन साहब यांनी केले.


     कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या सुरू असलेल्या लॉक डाऊन मध्ये ठीक ठिकाणी आपले कर्तव्य अहोरात्र पार पाडणाऱ्या पुरुष व महिला पोलीस कर्मचाऱ्यांना उम्मती फाउंडेशन' चे अध्यक्ष सोहेल बारुदवाला यांचेतर्फे सॅनिटायझर, मास्क व अल्पोपहाराचे वाटप मौलाना आझाद चौक तसेच बेलापूर रोडवरील चौकात करण्यात आले .त्या प्रसंगी मुफ्ती रिजवान यांनी आपले विचार व्यक्त केले .श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट व मुफ्ती रिजवान साहब यांच्या मार्गदर्शना ज्येष्ठ नगरसेवक मुजफ्फर शेख, पत्रकार सलीमखान पठाण, हाजी जलीलभाई काझी यांच्या हस्ते सर्व पोलिसांना हे साहित्य वितरण करण्यात आले.

       जनतेच्या सुरक्षेसाठी कर्तव्य बजावत असताना पोलिसांनी स्वतःच्या सुरक्षेच्यादृष्टीनेही योग्य ती दक्षता घ्यावी, अशा सूचना यावेळी उपस्थितांनी केल्या. समाजाचा व प्रशासकीय यंत्रणेतील महत्त्वाचा घटक हा पोलीस आहे. त्यांनी स्वत:चे आरोग्य सांभाळून इतरांच्या आरोग्यासाठी ही लढाई लढायची आहे. याकरिता प्रत्येकाने योग्य ती दक्षता घ्यावी. असे आवाहन ही मुफ्ती रिजवान साहब यांनी केले . हेड कांस्टेबल जोसेफ साळवे व इतर पोलिस कर्मचाऱ्यांचा यावेळी उत्कृष्ट कार्याबद्दल सत्कार करण्यात आला.

        सदरचा उपक्रम यशस्वी करण्यासाठी उंमती फाउंडेशनचे अध्यक्ष सोहेल बारूदवाला,डॉक्टर तोफिक शेख, फिरोज पठाण, युसुफ लाखानी,शाकीब पठाण, वसीम जहागिरदार, निरज शाह, माजिद मिर्झा, अलीम बागवान, शाहरुख बागवान, मोहसिन बागवान आदींनी विशेष परिश्रम घेतले. 

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post