UID : श्रीरामपूर तालुका आधार केंद्राअभावी 'आधारहीन' ; नागरिक शासकीय योजनांपासून वंचित ??

साईकिरण टाइम्स ब्युरो, 28 मे 2020
उक्कलगाव | प्रतिनिधी | आधीच कोरोना विषाणू संसर्गाच्या महामारीमुळे नागरिकांचे जगणे मुश्किल झाले आहे. त्यातच  श्रीरामपूर तालुक्यात आधार नोंदणी केंद्रे बंद असल्यामुळे  नागरिकांना शासनाकडून मिळणाऱ्या तुटपुंज्या मदतीपासूनही वंचित राहण्याची वेळ आली आहे. शासनाच्या सर्व योजनांसाठी आधार कार्ड मागितले जात असतानाच तालुक्यात कोठेही आधार कार्ड काढले जात नाही, दुरुस्ती केली जात नाही. त्यामुळे, श्रीरामपूर तालुका 'आधारहिन' झाला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन त्वरित आधार केंद्रे सुरु करण्याबाबत कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे.  


           केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना, गरीब निराधार लोकांपर्यत पोहोचणे आवश्यक आहे.  केंद्र सरकारने सुरु केलेल्या प्रधान मंत्री किसान सन्मान योजना, डोल,  उज्वला गॅसचे योजनेचे अनुदान, १० वर्षावरील सर्व मुली आणि महिलांना जनधन खात्यात  प्रति महिना ५०० रुपये हि योजना  केंद्र सरकारने सुरू केली आहे. सर्व सामान्य माणसाला शासकीय अनुदानाचा पर्याय उपलब्ध आहे ;परंतु बरेच लोकांचे आधार लिकंचे काम पुर्ण झाले नसल्याने व  कंपन्याच्या आडमुठेपणामुळे श्रीरामपूर तालुक्यातील लोकांना अनेक योजनांच्या अनुदानापासून यापासुन वचिंत राहण्याची वेळ आली आहे.  


            आधार कार्डवरील नाव,नावाचे स्पेलिंग, पत्ता, जन्म तारीख, लिंग, आदी अनेक दुरुस्त्या तसेच नवीन आधार नोंदणीचे कामे आधार केंद्रा अभावी बंद पडले आहेत. वयस्कर लोकांचे ठसे जुळत नसल्यामुळे आधार कार्ड अद्ययावत करावे लागते. अशा  अनेक दुरुस्त्या असल्याने आधार दुरुस्ती करण्यासाठी आधार केद्रांची आवश्यकता असते.  

           सध्या बॅक मित्रांकडून  बोटाच्या ठश्यामार्फत आधारावर पैसे काढता येत आहे ; परंतु अनेक लोकांचे बोटांचे ठसे उमटत नसल्यामुळे त्यांना पैसे काढता येत नाहीत. त्यामुळे लोकांनी आधार सेवा केंद्रावर धाव घेत आहे ; पण त आधार सेवा केंद्रांवर लिंकचे कामकाज बंद असल्याची परिस्थिती पहावयास मिळत आहे नव्हेतर श्रीरामपुर तालुका आधार लिंकपासून वचिंत राहत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे त्वरित लक्ष देऊन आधार केंद्रे सुरु करण्याबाबत कार्यवाही करावी, अशी मागणी जनतेतून होत आहे. 

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post