साईकिरण टाइम्स ब्युरो, 28 मे 2020
नेवासा |प्रतिनिधी | तालुक्यातील नेवासा बुद्रुक येथे साठ वर्षीय महिलेचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तिच्या संपर्कातील नगर येथील जिल्हा रुग्णालयातून पळालेला तिचा नातू घोडेगाव येथे पकडण्यात प्रशासनाला यश आले. त्यानंतर या व्यक्तीचे घशाचे स्राव घेऊन अहमदनगर येथे पाठवण्यात आले यानंतर आज रिपोर्ट आल्यानंतर सदरील रुग्ण पॉझिटिव्ह आल्याची माहिती तहसीलदार रुपेश सुराणा यांनी दिली.