सात्रळ | बाबासाहेब वाघचौरे | ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सात्रळ परिसरात ३३ केव्ही उपकेद्र ( सात्रळ सब स्टेशन) येथील अधिकारी व कर्मचारी यांची बैठक घेवून सुचना केल्या.
राहुरी तालुक्यातील सात्रळ पंचक्रोशीतील गेली अनेक दिवसा पासून येथील शेतकरी ग्रामस्थांना अनियमित विद्युत पुरवठ्याच्या सामना करावा लागत होता, येथील शेतकरी व ग्रामस्थ तसेच राष्ट्रवादीचे किरण कडु यांनी प्राजक्त तनपुरे यांना ट्विट करून समस्या मांडली होती. त्याची दखल घेत तनपुरे समक्ष सात्रळ येथे दुसऱ्याच दिवशी उपस्थित राहून महावितरणच्या संदर्भातील शेतकरी यांची अडचणी समजून घेत स्थानिक शेतकऱ्यांचे मन जिकले.
प्रश्न सोडविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सुचना देण्यात आल्या. तनपुरे म्हणाले की, कर्मचारी व अधिकारी यांनी शेतकऱ्यांना सन्मानाची वागणूक द्यावी. तसेच वीज पुरवठ्याचे वेळापत्रक तयार करून व्हाट्सएपच्या ग्रुपच्या माध्यमातून सुचना प्रसारीत करावी. त्यायोग्य अधिकारी आणि शेतकरी यामध्ये दरी निर्माण होता कामा नये. दलित वस्ती तसेच शेतकऱ्यांचे ट्रान्सफॉर्मरचे अपूर्ण कामे त्वरित करून सुरळीत वीज पुरवठा देण्याचे काम करावे. तसेच येथील महावितरण अधिकारी संतोष सुर्वे यांनी ना.तनपुरे यांचे समोर शेतकरी यांना सांगितले की, येथून पुढे आमचे कडुन विजेच्या संदर्भात काम बाबत कोणतीही दिरंगाई होणार नाही. तसेच कोणताही शेतकरी यांना वेठिस धरणार नाही अशी कबुली उर्जा मंत्री तनपुरे यांचे समोर शेतकरी यांनी ग्वाही दिली.
यावेळी तनपुरे म्हणाले, की सध्या देशात कोराना या आजाराने थैमान घातले आहे. येथील परिसरातील नागरिकांनी आपल्या कुटुंबाची ,गावाची,तसेच स्वतः च्या आरोग्याची काळजी घ्यावी. तसेच कोराना संदर्भातील शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.
यावेळी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष अरुण कडु, सात्रळचे उपसरपंच गणेश कडु, बाळकृण चोरमुंगे, पंकज कडु, संजय नागरे, आदिनाथ दिघे, सुर्यभान दिघे, जिल्हा परिषद मा. अध्यक्ष बाबासाहेब भिटे,नितिनसेठ बाफना, किरण कडु, सोपान हिरगळ, आण्णासाहेब कडु,आदि उपस्थित होते.
बैठकीनंतर ना. प्राजक्त तनपुरे यांनी पुन्हश्च ट्विटर वरून सात्रळ पंचक्रोशीतील समस्यांचे निवारण झाल्याचे ट्विट करण्यात आले. येथील ग्रामस्थ व शेतकरी वर्ग यांचेकडुन किरण कडु यांचे कौतुक करण्यात येत आहे