राहुरी | प्रतिनिधी | राहुरी फॅक्टरी येथील कामगार वसाहतीतील नाशिक येथील हॉटस्पॉट भागातून आलेल्या एका तरुणीस आज दिनांक २ मे रोजी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी होम क्वारटाइन शिक्का मारला. कोरोनामुळे सर्वत्र लॉगडाऊन असताना राहुरी फॅक्टरी येथे एक तरुणी नाशिकमधील हॉटस्पॉट भागातून आल्याची माहिती छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकीवर बंदोबस्त करणाऱ्या प्रमोद विधाटे व मनोज डोंगरे यांनी देवळाली प्रवरा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.अण्णासाहेब मासाळ यांनी दिली.
त्यानुसार डॉ. मासाळ यांनी सायंकाळी सदर तरुणीच्या घरी येऊन होम कोरनटाइन शिक्का मारून चौदा दिवस घरी राहण्याचे सांगितले. नाशिक, पुणे या भागातून अनेक जण कॉलनीत येत असल्याने सर्वत्र ही मोहीम वैद्यकीय सूत्रांनी राबविली. दरम्यान कोणी बाहेर गावातून घरी गावाकडे आल्यास तात्काळ कळवावे असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ.मासाळ यांनी केले आहे.