साईकिरण टाइम्स ब्युरो, 3 मे 2020
बेलापूर ( देविदास देसाई ) कोरोनाच्या संकटकाळातही आपला जीव धोक्यात घालुन कार्य करणारे पोलीस बांधव, आरोग्य कर्मचारी यांचा बेलापूर पत्रकार व बेलापूर ग्रामस्थांच्या वतीने गुलाबपुष्प देवुन टाळ्या वाजवून स्वागत करण्यात आले.
कोरोनाच्या गंभीर परिस्थितीत सर्व ग्रामस्थ घरात बसलेले असताना पोलीस बांधव व आरोग्य कर्मचारी आपल्या जिवाची बाजी लावुन सेवा देण्याचे काम करत आहे अशा देवदुतांचे मनोबल वाढावे, या हेतूने बेलापूर ग्रामस्थ व पत्रकारांच्या वतीने गुलाबपुष्प देवुन सर्वांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले.
बेलापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक डी बी उजे, पोलीस नाईक आर जे उघडे, पोलीस काँन्स्टेबल बाळासाहेब गुंजाळ, निखिल तमनर , पोपट भोईटे तसेच आरोग्य कर्मचारी डाँ .देविदास चोखर डाँ.प्रतिक काकडे आसाराम गोरे किरण दळवी अशोक साळवे गणेश टाकसाळ संतोष शेलार श्रीमती ग्रेटा कदम कांता शिंदे रत्ना नागले आदिंचे गुलाबपुष्प देवुन स्वागत करण्यात आले.
तसेच गोरगरीबासाठी मोफत भोजन चालवत असलेले सुवालाल लुक्कड व लुक्कड परिवार त्यांना सहकार्य करणारे रणजीत श्रीगोड यांनाही गुलाबपुष्प देवुन सन्मानित करण्यात आले. या वेळी पंचायत समिती सदस्य अरुण पा नाईक, अशोक कारखान्याचे संचालक अभिषेक खंडागळे, बेलापूरचे उपसरपंच रविंद्र खटोड, भरत साळुंके पाणी पुरवठा समितीचे उपाध्यक्ष मनोज श्रीगोड बेलापूर, खूर्दचे उपसरपंच शरद पुजारी, पत्रकार देविदास देसाई, पत्रकार दिलीप दायमा, ऐनतपुरचे पोलीस पाटील अशोक प्रधान, जावेद शेख, महेश कुऱ्हे, प्रसाद खरात आदि उपस्थित होते. या वेळी सोशल डिस्टनच्या नियमाचेही काटेकोरपणे पालन करण्यात आले पोलीस उपनिरीक्षक डी बी उजे यांनी सर्वांचे आभार मानले.
_______________________________________
आपल्या व्यवसायाची जाहिरात असंख्य लोकांपर्यंत पोहोचवा. जाहिरातीसाठी संपर्क मो. 9960509441 Adv.
_______________________________________
आपल्या व्यवसायाची जाहिरात असंख्य लोकांपर्यंत पोहोचवा. जाहिरातीसाठी संपर्क मो. 9960509441 Adv.
![]() |