Songaon : कडुवस्ती परिसरात बिबट्यांचा मुक्त संचार ; बिबट्याचे घडतेय दर्शन...


                         व्हिडीओ पहा
      
साईकिरण टाइम्स ब्युरो, 1 मे 2020
सात्रळ |बाबासाहेब वाघचौरे | राहुरी तालुक्यातील सात्रळ तांभेरे रोड लगत असलेल्या कडुवस्ती येथे बिबट्या राजरोसपणे धुमाकूळ घालत आहे. येथील शेतात गट नंबर  १४९  मध्ये बिबट्या जेरबंद झाला ; ही घटना ताजी असतानाच याठिकाणी 3 बिबटे दिलीप कडु यांच्या वस्तीनजिक डाळिबाच्या शेतात मुक्त संचार करतांना दिसत आहेत.


      सात्रळ, वाघचौरे वस्ती,कडु वस्तीत बिबट्या मुक्तपणे फिरत असल्यामुळे परिसरात  घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याने  संजय कडु सर यांच्या कंपाऊडहुन उड्या मारत घरातही शिरकाव करून शेळ्यांचा  फडशा काही दिवसांपूर्वी पाडला होता. काळजाचा थरकाप उडवणाऱ्या या बिबट्यांनी अनेक वेळा कालवडी, शेळ्या, कुत्रे यांच्यावर हल्लाही चढवून ठार केल्या आहेत. बिबट्याच्या मुक्त संचारामुळे दुध घालण्यासाठी जाणाऱ्या शेतकरी वर्गात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post